Posts

जीवेत शरद: शतं !!! Dr. Ashish Eklahare

Image
आशिष एकलहरे ..               आमच्या  Q Batch चा  roll no.27 if  I am not wrong.                                           गोरा  , उंचपुरा  त्याच्या कडे बघितलं  तरी पहिल्या झटक्यात  कोणी ही थंड होईल,   त्यात   त्याचा   एका विशिष्ट  धाटणीचा  भारदस्त आवाज..... film industry  मध्ये गेला असता तर  तर  शंभर टक्के यशस्वी झाला असता जितका आज वैद्यकीय क्षेत्रात तो यशस्वी आहे.                                                पण हा माणूस अतिशय शांत आणि सभ्य  , सदैव  हसतमुख ...                    त्याच्या  appearance  च्या exactly opposite  त्याचं behaviour....                         MBBS च्या  कालखंडात कुणाबरोबर आवाज चढवून बोलताना  मी तरी त्याला  कधीही    पाहिलं नाही... कदाचित तूम्ही देखील....                .                 .              WA  वर जरी फारसा active नसला तरी GT ला आवर्जून उपस्थित राहणारा...आणि  इतक्या वर्षानंतर  देखील  तो  जसा  होता  अगदी  तसाच आजही शांत आणि सभ्य...आणि हसतमुख....   .                कल्याण स्थित आपल्या मित्रावर अशीच परमेश्वराची   कृपादृष्टी राहो आणि  त्याचे

जीवेत शरद: शतं !!! Dr. Shubhangi Joshi Kale

Image
Dr. Shubhangi  Joshi.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा     91batch   मधील अतिशय सुसंस्कृत  शांत आणि सभ्य  personality...  college days ती जशी होती. तशीच आजही  एकदम  cool. ...आणि कुठल्याही परिस्थितीत संकटांवर मात करून यशस्वी होणारी... . आणि    आपलं  हे   वेगळंपण  आपण असंच कायम राहो.....आणि  शेजारच्या राज्यात  आपल्या कर्तुत्वाचे  झेंडे रोखत असताना आपल्या  जवळपास  तीस वष॔ जुन्या मित्रांना आठवणीत ठेवालं....अशी आशा व्यक्त करतो.....पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा... DR JAYANT DEOKAR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Pagar

Image
पंकज पगार....हे  नाव  screen वर  दिसलं  की   कित्येकांच्या भुवया  उंचावल्या  जातात  आणि कपाळावर  आठयाही   पडत असतील..      हे   फारच   खतरनाक  व्यकती मत्व...अगदी college   च्या दिवसापासून  ... अर्थात    काळानुरुप   त्याच्या मध्ये    जमिनआसमाना   एवढा बदल   झालायं..  अर्थात काही अपवाद वगळता ..... (   आणि  हो  .. हे   फक्त   माझेच   वैयक्तिक मत   नाहीये..तर   आपल्या तील   90  percent  जणांचे   असेल...लोक   खरं बोलायला  का  घाबरतात आणि आता  आयुष्याच्या   या वळणावर..    मला  कळत  नाही..     कदाचित   पंकज   पगार   नावाची  दहशत   सगळ्यांच्या मनात   आजही  कायम  आहे..असं वाटतंय   )..असो....तर  असा  हा  आपला  मित्र......          नशीब   म्हणजे  काय  असतं..  हे समजून   घेण्यासाठी   याच्याकडे   पाहावे..अर्थात  नशीब  म्हणजे सर्व   काही   नाही    स्वताचं कर्तुत्वही   लागतंच   आणि   एकदा  का  ती   कर्तुत्वाची  जोड   मिळाली   की   नशीबही असं काही  फळफळतं  आणि   माणूस  कुठल्या  कुठं  ऊंची  वर जाऊन   पोहोचतो..               याच मूर्तीमंत   उदाहरण   म्हणजे    पंकज पगार    .  .......             

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Pagar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा      आदरणीय आबा      स. न.वि.वि.       पत्रास कारण की,   सात्विक विचार म्हटलं की आठवतात स्वामी विवेकानंद अन् त्यांनी जगाला दाखविलेला देदीप्यमान आनंद ! सात्विक आहार म्हटलं की आठवतात जैन मुनी व त्यांनी दाखविलेला सात्विक आहार. सात्विक वातावरण म्हटलं की आठवतं पहाटेच्या वेळी मंदिरात होणारा घंटानाद अन् मंद दिव्याची वात ! सात्विक व्यक्तिमत्व म्हटलं की आपसुकच आठवतात आबा.     मालेगावात गत २० वर्षांपासुन ज्याने अतिशय सात्विक मनोवृत्तीने जनसेवा हीच ईश्वरसेवा या उदात्त हेतुने आपलं आयुष्य समर्पित करत जनमानसात स्वत:चा व वैद्यकीय क्षेत्राचा आदरयुक्त ठसा उमटवला असा अवलीया म्हणजे आमचा* *पंकज पगार** उर्फ *आबा .*        डाॅ . पंकज पगार म्हटलं ती डोळ्यासमोर येतो  सालस , सोज्वळ , खट्याळ, निष्काम कर्मयोगी, नेहमी चेहर्यावर स्मित हास्य, शर्ट इन केलेला व दिवसेंदिवस वाढणारी ढेरी, साधी रहाणी, तत्वनिष्ठ, बोले  तैसा चाले असं गौरवास्पद व्यक्तिमत्व .         आबांना व्यायामाची भलताच आवड आहे. त्यांनी बर्याच मॅराथाॅन स्पर्धांमध्ये भाग घेवून त्या वेळेत पुर्ण के

जीवेत शरद: शतं !!! Dr. Sonal Patel

Image
सोनल  पटेल.  Happy  birthday..     . SP  ...एक  वादळी व्यक्तिमत्व..आणि  एखादं वादळ शब्दाबद्ध  करणं अतिशय कठीण कामं आहे .  वादळं आयुष्य उद्ध्वस्त करायला येतात मात्र एखादं  वादळ  कुणाला तरी योग्य मार्गावर  आणून त्याच  जीवन समृद्ध करून टाकतं  ... SP हे ही तसंच एक वादळ  ..मागील वर्षी  प्रथम   नाशिकला आणि नंतर मुंबईला  धडकलं...   एखाद्या व्यक्तीबददल आपल्या ला   बरंच काही माहिती आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात खूप  काही माहिती  नसतं...  एका  single  letter   चा    बदल  / फरक  आयुष्य कसं बदलून टाकतो (  'e' to ' i'   )आणि मग त्याच्या विषयी एक उत्सुकता , कुतुहल निर्माण होतं ...  SP  त्या पैकी एक... college days  मध्ये  माझ्या  एका   अतिशय  चांगल्या   मित्राची   एकदम  जवळची खास मैत्रिण (   म्हणजे आजही आहे  )  एवढीच माझी आणि तिची ओळख... तिच्या फटकळ स्वभावाची सगळ्यांमध्ये कुजबुज होतं असे.. मात्र orthopedics  practical exam.च्या वेळी तिने  बरीच  मदत केली.. (  MS  Ajit आणि  मी   त्या वेळी  practical  exam  साठी एकाचं  batch मध्ये होतो..)( Third year ला.  First  part exam ला  म

जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वाती.... खरं तर   काॅलेज च्या  संपूर्ण   कालखंडात   हिचं   आणि माझं  एकदा ही   संभाषण झालं नाही...नागपूर  group  special batch   मध्ये   स्वाती  देशमुख   नावाची एक   मुलगी आहे   Tom boyish आणि सगळे तिला  JACK  नावाने ओळखतात...एवढीच काय मला तिच्या बद्दल   माहित... इतकी वष॔ं  झाली आणि   ती  group मध्ये   add    झाली....तेव्हा पासून Hi Hello चा परिचय....हिच्या  बेधडक post.सगळ्यांना   दखल घ्यायला  लावणारया..    रूपेश,  रूपाली सारखं   हिचं   भाषेवरील प्रभुत्व  खास करून   English  अचंबित करणारं.... sense of humour  ही जबरदस्त....आणि प्रत्येकाच्या   प्रत्येक   प्रश्नाला  तितक्याच   सडेतोडपणे,   चपखलपणे  उत्तर   देण्याचा कणखरपणा   कौतुक  करण्यासारखा..  कधी  विचार करायला लावणारे  , कधी  स्तब्ध करणारे   तर   विनोदाने   गंभीर विषयाला हात  घालणारे  blog  वरील   लेख..खरचं कौतुकास्पद....   UG नंतर  PG नंतर  job   at  various  places   आणि आता   MS and   chief   editor  at medical   college..at pondicherry..हा   हिचा    प्रवास ही   थक्क   करणारा...  लोकांना  प्रभा

जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती        सुपीक जमीनीत आपल्याला दूरदूरवर हिरवळ माळरान दिसते. परंतु बरड जमीनीत दूरदूरवर कुठेतरी एखादं क्षुप ( गवत) तग धरुन उभं रहाण्याचा प्रयत्न करत असतं; ते क्षुप म्हणजे आपल्या सर्वांची मैत्रीण *डाॅ* *स्वाती सुभाषराव देशमुख* उर्फ *जॅकी चॅन* उर्फ *जॅक.*        संघर्षाच्या हजार वाटा ।        संघर्षाच्या हजार गाथा ।        संघर्षच सदा दावणीला ।        संधर्षच उजळवील माथा ।।  खरचं संघर्ष म्हणजे काय हे स्वातीच्या आयुष्याकडे पाहुन थक्क व्हायला होतं.     महात्मा गांधींच्या वर्धा या शहरातून जॅकचा प्रवास सुरु झाला. वर्ध्याच्या जानकीदेवी बजाज काॅलेज आॅफ सायन्स मध्ये असतांना पासुन ते NDMVP MEDICAL COLLEGE मध्ये असतांनाही तिने मोठा संघर्ष स्वत:शी व प्रतिकुल घडामोडींशी केला आहे.      ठेंगणी, बारीक देहयष्टी, अभिनेता जॅकी चॅनशी मिळता जुळता चेहरा असणार्या स्वातीला काॅलेज मध्ये जॅकी चॅन म्हणून चिडवायचे व तेव्हा स्वाती फार चिडायची, परंतु आता तिला जॅक म्हणून घेण्यात कधीच चिड येत नाही.       साधी रहाणी, उच्च विचार, मितभाषी, मनस्व