जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar



वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती

       सुपीक जमीनीत आपल्याला दूरदूरवर हिरवळ माळरान दिसते. परंतु बरड जमीनीत दूरदूरवर कुठेतरी एखादं क्षुप ( गवत) तग धरुन उभं रहाण्याचा प्रयत्न करत असतं; ते क्षुप म्हणजे आपल्या सर्वांची मैत्रीण *डाॅ* *स्वाती सुभाषराव देशमुख* उर्फ *जॅकी चॅन* उर्फ *जॅक.*


       संघर्षाच्या हजार वाटा ।
       संघर्षाच्या हजार गाथा ।
       संघर्षच सदा दावणीला ।
       संधर्षच उजळवील माथा ।।

 खरचं संघर्ष म्हणजे काय हे स्वातीच्या आयुष्याकडे पाहुन थक्क व्हायला होतं.

    महात्मा गांधींच्या वर्धा या शहरातून जॅकचा प्रवास सुरु झाला. वर्ध्याच्या जानकीदेवी बजाज काॅलेज आॅफ सायन्स मध्ये असतांना पासुन ते NDMVP MEDICAL COLLEGE मध्ये असतांनाही तिने मोठा संघर्ष स्वत:शी व प्रतिकुल घडामोडींशी केला आहे.

     ठेंगणी, बारीक देहयष्टी, अभिनेता जॅकी चॅनशी मिळता जुळता चेहरा असणार्या स्वातीला काॅलेज मध्ये जॅकी चॅन म्हणून चिडवायचे व तेव्हा स्वाती फार चिडायची, परंतु आता तिला जॅक म्हणून घेण्यात कधीच चिड येत नाही.

     
साधी रहाणी, उच्च विचार, मितभाषी, मनस्वी, ऋजुता, अभ्यासू , कामात सातत्य, इंग्रजी ग्रंथांची अभ्यासक, इंग्रजीतुन लिखाण करणारी लेखीका, भावी पिढीसाठी दिपस्तंभ, प्रामाणिकपणे व सचोटीनं आयुष्याचं खर गमक समजून त्यांवर मार्गक्रमण करणारी एक आदर्श व्यक्ती, पर्यटनाची व निसर्गाची आवड जपणारी, संवेदनशील मनाची, परखड साहित्यिक म्हणजे जॅक .

      जॅक एक उत्कृष्ट शिक्षिका आहे. विद्यार्थी व वैद्यकिय महाविद्यालयाशी तिची नाळ आजुनही अबाधित आहे. जीवनात नेमकं कशाला आणि किती महत्व द्यायचं याचं ज्ञान स्वाती कडे असल्याने यश व समाधान तिला गवसलंय.

      जॅक तुझं भावी आयुष्य निरोगी , आनंदाचं व सुखसमाधानाचं जावो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत; तुला व तुझ्या कुटुंबीयांना आशिर्वाद रुपी कोंदण लाभावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

     अरुण दातेंचं भावगीत खास आजच्या दिवशी

या जन्मावर , या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही, रुजुन आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे....

रंगाचा उघडुनिया पंखा, सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे.....

या ओठांनी चुंबुन घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्व तरावे.
या जन्मावर या जगण्यावर , शतदा प्रेम करावे.....

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

आठवणीतला म्हाळशेज....