Don't Stop When You Are Tired, Stop When You're Done
सायकलिंग हे एक व्यसन आहे आणि प्रत्येक सायकलिस्ट हा एक व्यसनाधीन व्यक्ती!* आता मात्र तुम्हाला राग आला असेल. अरे लिहिता येतं म्हणून काहीही लिहायचं? साहजिकच आहे ते. पण जसजसं आपण कथेत पुढं सरकू तसतसं तुम्हालाही माझ्या उपरोक्त विधानाच्या सत्यतेची खात्री पटेल. शनिवारी रात्री अरुण भाऊ काळेंचा फोन आला. *उद्या काय करताय?* वास्तविक हा रविवार *ट्रिपल SR गणेश माळीच्या* २१००० हजार kms पूर्ती निमित्त R2G2 ग्रुप ने आयोजित ride चा दिवस. पण खुद्द सत्कारमूर्तीच व्यवसायानिमित्त व्यस्त असल्याने ठरलेला कार्यक्रम फिस्कटला आणि गणेश, रतन, रामदास, डॉ राहुल, किरण आणि समीर सर या दिग्गजांच्या सोबत ride करण्याचं माझं स्वप्न तूर्त तरी अपूर्णच राहिलं. काही विशेष नाही. Ride ला जायचं आहे. पण मार्ग नाही ठरवला अजून--मी बोललो. *सकाळी शार्प ६ ला तयार रहा. मी येतो विंचुरीला. मग आपण जाऊ.* अरुण भाऊ म्हणजे अस्सल मराठमोळा रांगडा गडी. पटलं तर जीवाला जीव देणारा, पण बिनसलं तर समोरच्याला कच्चा खाणारा. एक सळसळणार्या रक्ताचा तरुण. कायम त्याच्याशी बोलताना-वागताना मी एक लक्ष्मणरेष...