जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Pagar
हे फारच खतरनाक व्यकती मत्व...अगदी college च्या दिवसापासून ... अर्थात काळानुरुप त्याच्या मध्ये जमिनआसमाना एवढा बदल झालायं.. अर्थात काही अपवाद वगळता ..... ( आणि हो .. हे फक्त माझेच वैयक्तिक मत नाहीये..तर आपल्या तील 90 percent जणांचे असेल...लोक खरं बोलायला का घाबरतात आणि आता आयुष्याच्या या वळणावर.. मला कळत नाही.. कदाचित पंकज पगार नावाची दहशत सगळ्यांच्या मनात आजही कायम आहे..असं वाटतंय )..असो....तर असा हा आपला मित्र...... नशीब म्हणजे काय असतं.. हे समजून घेण्यासाठी याच्याकडे पाहावे..अर्थात नशीब म्हणजे सर्व काही नाही स्वताचं कर्तुत्वही लागतंच आणि एकदा का ती कर्तुत्वाची जोड मिळाली की नशीबही असं काही फळफळतं आणि माणूस कुठल्या कुठं ऊंची वर जाऊन पोहोचतो.. याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पंकज पगार . ....... .. College days मध्ये पंकज पगार भविष्यात असा असेल असे भाकित कोणी वर्तविले असते तर सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले असते... ( कदाचित MS Ajit सारख्याने दोन कानाखाली दिल्या असत्या.. ) . आजही नारायण सर आणि हुद्दार सर स्वर्गातून बघतं असतिल तर त्यांचा स्वताच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की हाच तो पंकज पगार की ज्याला first year ला शिकवले कमी पण get out च जास्त केले...college days मध्ये लोकं याच्या पासून दूरच राहणयाचा प्रयत्न करतं कारण हा माणूस कधी काय करेल याचा नेम नसायचा......कधी कुणाच्या रूमवर जाऊन धूडगुस घाल .कधी कुणालाही भिडणार ....अर्थात उमेश भाऊंचे भक्कम पाठबळ असायचं... उमेश भाऊ गायब की पंकज डाॅन ची हवा गुल....यातील काही कथां चा मी साक्षीदार आहे तर काही ऐकीव किस्से... इतक्या . positive and negative shades असलेला पंकज म्हणजे त्याच्या सारखा तोच.. ..no one else.. असो... पु. ल. किंवा द. मा. मिरासदार यांच्या काळात हा असता आणि त्यांच्या नजरेत पडला असता तर "व्यकती आणि वल्ली " किंवा " भोकरवाडीच्या गोष्टीत " याचीही एखादी गोष्ट असलीच असती.....असो ... असा हा आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणात असणारा ( त्याच्या बहुरंगी गुण वैविध्याने ).
आज मालेगाव चा. Obst gynae मधील खराखुरा " KING "... आहे......त्याच अद्ययावत HOSPITAL आणि डोळ्यांच पारणं फेडणार घर....त्याच्या PERSONAL AND PROFESSIONAL LIFE च्या यशस्वी कारकीर्दीची साक्षीदार आहे..... हा माणूस हरहुन्नरी आहे आणि मित्रासाठी काहीही ..या तत्वावर चालणारा.. आणि त्या साठी वेळ, काळ , कारण कसलीही गरज नाही..... Mumbai.GT हून परत येताना कल्याण जवळ highway ला त्या ने जबरदस्त पार्टी दिली... 14 -15 जणांना....भर दुपारी 🥂🥂 चा पूर.... bill Rs 13000...... त्यानेच भरलं.....कारण काय तर तूम्हाला hosp opening च्या पुजेला येणं जमलं नाही...म्हणून ही पार्टी... आता बोला.... .
एकदम कलाकार माणूस... प्रत्येक GT attend करणार....आणि आपले विविध कलाविष्कार दाखवून देणार. ..याचा एका GT मधील लावणी वर केलेला dance बघाल , तर तुम्हीही " पाटील " बनून फेटे उडवायला लागालं . पंकज या वाढदिवसाच्या निमित्ताने तू अपार मेहनतीने यशाची नविन शिखरे पादक्रांत करशील आणि मालेगावच्या या DON वर परमेश्वराची आणि नशिबाची कृपादृष्टी अशीच कायम राहील.. या मनापासून शुभेच्छा देतो. ....... आणि DON .. चुकभुल द्यावी घ्यावी .....अन्यथा मालेगाव हून कधी ट्रकभर माणसं घेऊन तू इथे माझ्याकडे येशील आणि धूडगुस घालशील याचा भरवसा नाही............
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ....Wish u good health and happiness dear Pankaj....
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment