Posts

Showing posts with the label Reunion Mhalshej

आठवणीतला म्हाळशेज....

Image
*आठवणीतला म्हाळशेज* कोविड ने सर्वांप्रमाणे माझंही मत परिवर्तन केलंय. २०२० च्या ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बेड वर पडल्यापडल्या *त्या गवाक्षातून* बाह्य जग न्याहाळताना मनाशी पक्की खूणगाठ बांधली, इथून जिवंत बाहेर पडलो तर त्या सर्वांना फोन करेन ज्यांच्याशी मी अबोला धरला आहे, त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करेन ज्यांनी मला दुखावलं होता, आणि माझ्या मेडिकल कॉलेजच्या मित्रांना आवर्जून भेटेल ज्यांना काही न काही कारणास्तव गेली २३ वर्षे भेटू शकलो नाही. त्या सर्वांमध्ये जाईन, राहीन आणि सर्वांना कुठलाही आडपडदा न ठेवता आवर्जून सांगेन की मित्रांनो, तुम्हा सर्वांशिवाय हा अनिल अपूर्णच आहे. नियतीला हे सर्व मान्य होतं आणि मी सुखरूप हॉस्पिटलतून बाहेर पडलो. सर्वांना स्वतःहून फोन केला. मी सुखरूप आहे सांगितलं आणि लवकरच भेटण्याचं वचन दिलं. वायदे करणं सोपं असतं, ते पाळणं कठीण असतं. नेहमीचं रहाटगाडगं चालू झालं आणि मी त्यात व्यस्त झालो. पण पूर्वीसारखं जीव काढणं सोडून दिलं. मनाला वाटेल आणि पटेल तेच करणं सुरू केलं. गेट टू गेदर चा मेसेज ग्रुप वर पडला. *गोवा.*  ईच्छा असूनही मी सहभागी होऊ शकत नव्हतो. फीस ही आव

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

Image
ये कहॅा आ गये हम... यॅूं ही साथ साथ चलते …..    अमिताभ ने हे गाणे सिलसिला मध्ये म्हटले आहे पण खर तर तो फक्त अभिनय होता , पण हा अनुभव जर स्वत:ला प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर तुम्हास दोस्ती लेकवुड रिसोर्ट , माळशेज येथे येण्याशिवाय पर्याय नाही.     खर तर १२ फेब्रुवारी च्या स्नेहसंमेलनाची मुहुर्तमेढ २ महिण्यांपुर्वी  संदिप वाबळेच्या फोन मुळे झाली. संदिपने मला व JD  ला फोन वरून संकल्पना मांडली व त्यास आम्ही अनुमोदन दिले व Get together  करायचे तर माळशेजलाच हे पक्के ठरले. नंतर सुनिल आम्हा तिघांना येऊन मिळाला, व त्यानंतर खरी आग्रहाला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांना फोन व आग्रह करुन झाले, पण पाहिजे तसे यश येत नव्हते ; तशात omicron मुळे तर GT  होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . नंतर आरोग्यावरील संकट निवळल्यावर मात्र *माळशेज* वर शिक्का मोर्तब झाले.    Organiser Team च्या आग्रहावरून स्वप्ना आम्हाला join झाली व तिथूनच पुढे सर्वांना पुन्हा फोन व आग्रह झाले. मी, सुनील व JD तिघांनी मिळुन *घटनास्थळी*भेट दिली आणि १२ फेब्रुवारी तारीख निश्चित झाली.         आयोजकांनी कोणती कामे कोणी करायची ते ठरले व १२