जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Pagar

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा

     आदरणीय आबा
     स. न.वि.वि.
      पत्रास कारण की,
  सात्विक विचार म्हटलं की आठवतात स्वामी विवेकानंद अन् त्यांनी जगाला दाखविलेला देदीप्यमान आनंद ! सात्विक आहार म्हटलं की आठवतात जैन मुनी व त्यांनी दाखविलेला सात्विक आहार. सात्विक वातावरण म्हटलं की आठवतं पहाटेच्या वेळी मंदिरात होणारा घंटानाद अन् मंद दिव्याची वात ! सात्विक व्यक्तिमत्व म्हटलं की आपसुकच आठवतात आबा.

    मालेगावात गत २० वर्षांपासुन ज्याने अतिशय सात्विक मनोवृत्तीने जनसेवा हीच ईश्वरसेवा या उदात्त हेतुने आपलं आयुष्य समर्पित करत जनमानसात स्वत:चा व वैद्यकीय क्षेत्राचा आदरयुक्त ठसा उमटवला असा अवलीया म्हणजे आमचा* *पंकज पगार** उर्फ *आबा .*

       डाॅ . पंकज पगार म्हटलं ती डोळ्यासमोर येतो  सालस , सोज्वळ , खट्याळ, निष्काम कर्मयोगी, नेहमी चेहर्यावर स्मित हास्य, शर्ट इन केलेला व दिवसेंदिवस वाढणारी ढेरी, साधी रहाणी, तत्वनिष्ठ, बोले  तैसा चाले असं गौरवास्पद व्यक्तिमत्व .
        आबांना व्यायामाची भलताच आवड आहे. त्यांनी बर्याच मॅराथाॅन स्पर्धांमध्ये भाग घेवून त्या वेळेत पुर्ण केल्यात. तसेच आबांना पर्यटनाचाही भलताच  छंद , कुठलिही सहल असली की आंबांचे सुयोग्य नियोजन , तेथील नकाशे, **सोय* *यांचे अचूक आडाखे असतात .
        MOGS चा जगन्नाथाचा रथ आबांनी त्यांच्या समर्थ खांद्यांवर पेलुन मालेगाव व पंचक्रोशीतील डाॅक्टरांसाठी नुकताच स्वत:च्या रुग्णालयात Lap surgery चा वर्कशाॅप अत्यंत कुशलतेने तडीस नेला व त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व परत सिध्द करुन दाखविले. 
तर असा हा बोलघेवडा , मिठासवाणी बोलणारा असोसिएशनच्या कामासाठी निसंदिग्ध कसेही, कधीही, कुठेही तयार असणारा आबा हा आमचा मित्र , बॅचमेट असल्याचा सर्व १९९१ बॅचला अभिमान आहे .

प्रॅक्टीसच्या अथांग सागरातील मोत्यांची तुमची ओंजळ अशीच भरलेली असु द्यात याच आजच्या वाढदिवसशी आई जगदंबेचरणी प्रार्थना.

पुनश्च वाढदिवस अभिष्टचिंतन 

यशवंत व्हा ,
किर्तीवंत व्हा !!

आपला मित्र,
रुपेश ठाकूर.

DR RUPESH THAKUR



Comments

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

आठवणीतला म्हाळशेज....