Posts

जीवेत शरद: शतं !!! Dr Ashish Mehta

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशिष मेहता... "मैं अकेला ही चला था.. मगर लोग आते गए और कारवां बनता गया" असच काही घडलय  मज़ाक़ मज़ाक़ मध्ये लिहायला घेतल अन्  आज ३५ व पुष्प !! प्रत्येक व्यक्तिमध्ये  भरपूर सदगुण तर  आपल्या द्रृष्टीने  काही दुर्गुण असतात ,  अर्थात सकारात्मक विचाराने तुमच्यापर्यंत चांगल्या गुणांच्या देण्याघेण्याचा  व्यापार करतांना  , आपल्यापर्यंत पोहचवतांना तुमच्याच सद्गुणांच्या  सानिध्यात  ‘हा देह झाला चंदनाचा  अन् हाताचा सुवास जाता जाईना ! ‘ तर  असाच आजचा उत्सवमूर्ति आहे  *आशिष मेहता ! * सिकंदराच्या काळात  पुरु नावाचा राजा पूर्व पंजाबावर राज्य करत होता. तो एक शूर व पराक्रमी योध्दा होता . तो एक विद्वान होता .पुरु राजा युद्धात हरला पण तो  सिकंदर पुढे लाचार झाला नाही .त्याने सिकंदराला भेटल्यावर एका राजाप्रमाणेच वागणुक मिळावी असे निक्षून सांगितले . तसाच आपल्या १९९१ बॅच मधील पुरु म्हणजे आशिष ; medical field पासुन दूर गेल्यावर तो कुठल्याही संकटांसमोर झुकला नाही तर सर्व आव्हनांना धिराने तोंड दिले व आज तो furniture उद्

जीवेत शरद: शतं !!! Dr. Hiren Shah

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिरेनभाई आपण प्रत्येक जण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतांना काही स्वप्न , काही ऊद्दीष्ट मनाशी बाळगून आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असतो , कधी हा प्रवास खडतर असतो तर कधी सुखावह , या दरम्यान  पाहिलेल स्वप्न जेव्हा सत्यात उतरत तो खरा पूर्तीचा क्षण ! असाच क्षण अनुभवणारा  सुखी माणूस म्हणजेच *_HK_* म्हणजे डाॅ हिरेन कांतीलाल शाह.   NDMVPS MEDICAL COLLEGE NASHIK येथे प्रवेश मिळवल्यानंतर मुळताच प्रचंड बुद्धिमान असलेला HK अजून खुलत गेला ,  बहरत गेला  .  फक्त पुस्तकी किडा बनून न रहाता सर्वांगीण विकास करत तिथं प्रथम मराठी शिकून त्यांवर प्रभुत्व मिळविले.    MBBS नंतर आपल्या मातृभुमी म्हणजे गुजरात येथे Anesthesia मध्ये PG करुन आपल्या मुळ गावी मोडासा मध्ये Anesthesia practice सुरु केली; पण स्वस्थ बसेल तो HK कसला त्याने Unity hospital नावाचे multispeciality & trauma care centre सुरु करुन  मोडासा व परिसरातील रुग्णांची सेवा यशस्वीपणे सुरु ठेवली आहे. _*HK*_ म्महणजे मला  भेटलेला राजा माणूस , अतिशय आनंदी , दिलखुलास , मित्रांसोब

जीवेत शरद: शतं !!! Dr.Ajit Patil

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजित   शालेय जीवनात शिकत असतांना काही संस्कार नकळत आपल्यावर होत असतात. काही शाळा , काही शिक्षक जादूगारासारखं आपल जीवन बदलू शकतात. तर काही मित्रही वेगळ वळण देऊ शकतात, चांगलही अन् कधी वाईटही.      सैनिक स्कुल ही तशीच एक शाळा, ग्रामीण तथा शहरी भागातील विद्यार्थांसाठी सी.बी.एस.सी माध्यम शिकायला मिळावं या उद्दात्त हेतुने शाळा व वसतिगृह एकाच ठिकाणी उभारले. व अशाच सातारा सैनिक स्कुल मधुन ताऊन सुलाखुन निघालेला विद्यार्थी म्हणजे अजित सुभाष पाटील.       सैनिक स्कुलला पोहोचल्यावर मात्र अजितला नवे आकाश मिळाले , कुठलिही मर्यादा नसलेले. मग तो अभ्यासात स्वैर संचार करु लागला नव्या ध्येयाच्या दिशेने , अन् ज्ञानाचं भांडार त्याच्यासाठी खुले झाले. बारावी नंतर NDMVP Medical college Nashik मधुन MBBS व पुढे प्रवरानगर , लोणी येथुन MS GYN करुन आज तो आपल्या आडगाव काॅलेजच्या रुग्णालयाचा MS आहे. ज्या काॅलेज मधुन UG  केले त्याच ठिकाणचा आज तो सर्हेसर्वा असल्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व बॅचमेट्सला आहे.       आपल्या मितभाषी बोलण्याने व अमोघ ज्ञानामुळे कमी कालाव

जीवेत शरद: शतं !!! Dr. Vijay Gawli

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विजय   नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक  क्षेत्राच अवलोकन करायच ठरल तर अनेक दिग्गज व्यक्ति या गावान समाजाला दिल्यात ज्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत .  वैद्यकीय क्षेत्रातही अनेक प्रतिभाशाली विद्यार्थी डॉक्टर झालेत, काही जगभर  , भारतभर  आपल्या  नाशिकचं नाव पोहचवताय तर काही ~ या चिमण्यांनो परत फिरा रे “ या आव्हानाला प्रतिसाद देत पुन्हा आपल्याच नाशकातील रूग्णांची सेवा करतायेत , असच एक विख्यात नाव  *डाॅ विजय गवळी* NDMVPS MEDICAL COLLEGE,NASIK  येथुन MBBS ची पदवी घेऊन  PMT LONI मधुन PATHOLOGY DIPLOMA करुन नंतर BJMC PUNE येथुन DNB करुन हा पठ्ठ्यानं  लंडन मध्ये Transfusion Medicine मध्ये फेलोशिप करुन नाव कमावलं. पण त्याला नाशिक खुणावत होतं व शेवटी त्याने नाशिक येथे BLOOD BANK सुरु केली व आता तर त्याने Zambia मध्ये diagnostic centre  व अद्ययावत हाॅस्पीटल सुरु केले आहे . कुठलाही इगो मनांत न ठेवता दिवसरात्र मेहनत करुन आपल ध्येय गाठलं. याच अनुभवावर आजपर्यंत असंख्य रूग्णांचे प्राण  वाचवून अनेकांना वेदनामुक्त  करून  निरामय जीवन दिले आहे . आज

जीवेत शरद: शतं !!! Dr. Jaydeep Bhambare

Image
वाढदिवसाच्पाहार्दिक शुभेच्छा जयदीप  सुपिरसिध्द  लेखक  व . पु . काळे यांच एक खुप सुंदर वाक्य आहे -  " अंधारातील प्रवासासाठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि त्यांच वेळेस  आपलाही हात कोणाला तरी हवा असतो " मित्रहो  सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात जगभर कुठही असलो म्हणजे एकमेकाशी संवाद साधण सोप झालय , माहिती व तंत्रज्ञानाने जग इतक जवळ आलय  की एका बोटाच्या क्लिकवर आपण काहीही पाहू शकतो  अथवा काहीही माहिती मिळऊ शकतो उदा. आपल्याला काही medicines अथवा काही आजारांची ट्रिटमेंट माहिती करुन घ्यायची असल्यास गुगलची मदत घ्यावी लागते. पण जेव्हा हे नव्हत तेव्हा  ?  किंवा अजूनही गुगल पेक्षा भक्कम पर्याय नेहमी उपलब्ध आहे तो म्हणजे भुबल  !!!! कधीही , कितीही वाजता , कुठेही  तुम्हाला  medicine विषयी अडचण आली डायल करा भुबल !! याचे पायोनियर आहेत  स्वत:  *डॅा जयदीप भांबारे  !* प्रॅक्टीसमध्ये कुठलाही आजार अथवा complications असो, त्याविषयी एकदम इथंबुत  व latest माहिती व treatment तुम्हाला त्वरित मिळेल या हाडाच्या Physician कडुन . उंच शरीरयष्टी , धारदार नाक , ति

जीवेत शरद: शतं !!! Dr. Nilesh Shelar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निलेश आज दिवाळीचा दुसरा दिवस  व डाॅ निलेश शेलार यांचा प्रकटदिन . हा फक्त योगायोग नाही तर निश्चितत: एक कार्यसिध्दता असावी.        कालिदासांच्या रघुवंश या रघुवंशीय राजांच्या आजन्म शुध्दनामाची आठवण होते. आपला या सुंदर आयुष्यात तीन गोष्टींसाठी जन्म झाला.  एक मात्यापित्याची पुण्याईने, दुसरा आपल्या कर्मानुसार, तर तिसरा वैश्विक गरजेतुन ; आपल्या हातून या विश्वासाठी काही कार्य व्हाव, काही अपुर्ण पुर्णत्वास जावं, समृध्द व्हावं, खर तर अशीच काही परमेश्वरीय इच्छा असावी म्हणूनच रोग्यांचं  दु:ख नाहीस करणं , त्याच्या आयुष्यात आनंद द्यावा हीच पुर्णत्वाची प्रचुरता डाॅ निलेश आपल्या या वैश्विक जन्माचा विनियोग निश्चितत: अनुकरणीय आहे .  मनानं अतिशय निर्मळ , सतत हसतमुख प्रचंड सकारात्मक उर्जा  कुटुंबासाठी , नातलगांसाठी आधारवड मित्रांसाठी प्रेमळ सखा,अजातशत्रु , रोग्यांसाठी धन्वंतरी, समाजासाठी प्रेरणा, अस्थीरोगशास्राचा गाढा अभ्यास व अस्थीरोगशास्रासाठी समर्पित असलेल्या निलेशला नक्कीच सर्वाधीक शुभेच्छा व स्नेहभाव.     आपलं आयुष्य असंच रुपमय

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pravin Gore

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण  महान नाटककार शेक्सपियरच एक वाक्य आहे नावात काय आहे ?  पण मला नेहमी वाटत , बस नाम ही काफी है ! काहींच्या नावातच इतका दम असतो की ते नाव त्याची ओळख  बनवते , वलय निर्माण करते .  असच एक नाव आहे             *गोरे* आमच्यासाठीही हे नाव मनांत बसलय ते डाॅ प्रविणच्या रुपाने ,  डॉ प्रविण गोरेच्या व्यक्तिमत्वान !    मुंबई ते नाशिक - व्हाया आडगाव हा मित्रांनी भरलेला सुखमय प्रवास आजही आम्हाला खुणावतो !      विषय कुठलाही असो राजकारण  , समाजकारण  वा मेडिकल , सखोल अभ्यास  सडेतोड ऊत्तर , कुठलाही चोपडेपणा नाही  अगदी ठाम  , एककल्ली मत , सिधी बात नो बकवास !   अभ्यासाची व   पर्यटनाची प्रचंड आवड असणारा प्रविण आयुष्याचा मनमुराद आनंद घेतो , परिसरातील  तसेच परदेशातीलही सर्व प्रेक्षणिय स्थळांची इत्यंभूत माहिती असलेला एकमेव गाईड म्हणजे प्रविण, मित्रांच मोठ वर्तुळ असलेला सांगाती , नवनवीन टेक्नाॅलाॅजीचा वापर करून नव्या कल्पनाविलासात रमणारा , नेहमी अपडेटेड रहाणारा , सबसे आगे सबसे तेज़ , कधी विडंबनकार  तर कधी तत्ववे