जीवेत शरद: शतं !!! Dr. Jaydeep Bhambare

वाढदिवसाच्पाहार्दिक शुभेच्छा जयदीप 


सुपिरसिध्द  लेखक  व . पु . काळे यांच एक खुप सुंदर वाक्य आहे -  " अंधारातील प्रवासासाठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि त्यांच वेळेस  आपलाही हात कोणाला तरी हवा असतो "

मित्रहो  सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात जगभर कुठही असलो म्हणजे एकमेकाशी संवाद साधण सोप झालय , माहिती व तंत्रज्ञानाने जग इतक जवळ आलय  की एका बोटाच्या क्लिकवर आपण काहीही पाहू शकतो  अथवा काहीही माहिती मिळऊ शकतो उदा. आपल्याला काही medicines अथवा काही आजारांची ट्रिटमेंट माहिती करुन घ्यायची असल्यास गुगलची मदत घ्यावी लागते.
पण जेव्हा हे नव्हत तेव्हा  ? 
किंवा अजूनही गुगल पेक्षा भक्कम पर्याय नेहमी उपलब्ध आहे तो म्हणजे
भुबल  !!!!
कधीही , कितीही वाजता , कुठेही 
तुम्हाला  medicine विषयी अडचण आली डायल करा भुबल !!
याचे पायोनियर आहेत 
स्वत: 
*डॅा जयदीप भांबारे  !*

प्रॅक्टीसमध्ये कुठलाही आजार अथवा complications असो, त्याविषयी एकदम इथंबुत  व latest माहिती व treatment तुम्हाला त्वरित मिळेल या हाडाच्या Physician कडुन .

उंच शरीरयष्टी , धारदार नाक , तिक्ष्ण डोळे ,     गव्हाळ  रंग , Soldier सारखे  दिसण्यासाठी     ठेवलेली  केशरचना ( टक्स ), सतत धावपळ व 
नेहमी ऊत्साह ओसंडून वाहणारा धबधबा ,
ओव्हररिचार्ज अनलिमिटेड पॅकेज म्हणजे  *जयदीप *.


लहानपासून प्रचंड बुद्धिमान असलेला जयदीप मित्रामध्ये बराच रमला .
नाशिक येथून MBBS केल्यावर त्याने DNB व FCPS MEDICINE करुन आज तो नाशिक रोड मधील सर्व स्तरातील रुग्णांना नवसंजीवनी देण्याच्या काम करीत आहे .

प्रामाणिकपणे व स्ट्रेटफॉरवर्ड प्रँक्टीस करण हा महत्वाचा गुण , गरीबांचा वाली होऊन त्यांना मदत करण , स्वताला न फसवतां आनंदी रहाण , 
आजही तो याच नियमांच पालन करतोय ,
काहीसा अबोल असलेला जयदीप मात्र अतिशय हेल्पफुल स्वभावाचा आहे , कुणालाही मदत करायला नेहमी तयार असतो .
रुग्ण तसेच आपल्या समव्यवसायी डाॅक्टरांमध्ये  संकटमोचक असणारा  आॅलराऊंडर अवलिया म्हणजे *जयदीप* .


 आज नरकचतुर्दशी , आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करुन त्याच्या जाचातून संपुर्ण पृथ्वीला सोडवले तसेच आपला जयदीप सर्व रोगांशी लढून त्यांचा नायनाट करुन समस्त रुगणांना रेगांपासुन दूर ठेवतो. 


लासलगाव स्थित भांबारे परिवाराची संयमी वृत्ती त्याच्याकडे असल्याने जीवनात नेहमी यशस्वी झालाय .


तर अशा या मित्राचा ,नाशिकरोड मधील नवरत्नांचा अर्क असलेल्या  जयदीपचा आज वाढदिवस !

आयुष्याचा मनमुराद  आनंद लुटत असतांना सर्व प्रकाराची सुखं पुन्हापुन्हा यावी , 
जणूकाही ऊत्तोरोत्तर  आनंदाची बरसात अविरत कोसळावी व त्या सरींनी आयुष्य अजून बहराव याच शुभेच्छासह ....
जन्मदिन अभिष्टचिंतन 

Happy birthday Jaydeep
💐💐💐
सर्व मित्रमैत्रीणी व त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजन आहे , आपल्या सर्वांवर लक्ष्मीची अखंड कृपा राहो व आपली उत्तरोत्तर भरभराट होवो हिच आजच्या मंगलदिनी  शुभकामना.

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....