जीवेत शरद: शतं !!! Dr.Ajit Patil


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजित

  शालेय जीवनात शिकत असतांना काही संस्कार नकळत आपल्यावर होत असतात. काही शाळा , काही शिक्षक जादूगारासारखं आपल जीवन बदलू शकतात. तर काही मित्रही वेगळ वळण देऊ शकतात, चांगलही अन् कधी वाईटही.


     सैनिक स्कुल ही तशीच एक शाळा, ग्रामीण तथा शहरी भागातील विद्यार्थांसाठी सी.बी.एस.सी माध्यम शिकायला मिळावं या उद्दात्त हेतुने शाळा व वसतिगृह एकाच ठिकाणी उभारले. व अशाच सातारा सैनिक स्कुल मधुन ताऊन सुलाखुन निघालेला विद्यार्थी म्हणजे अजित सुभाष पाटील.

      सैनिक स्कुलला पोहोचल्यावर मात्र अजितला नवे आकाश मिळाले , कुठलिही मर्यादा नसलेले. मग तो अभ्यासात स्वैर संचार करु लागला नव्या ध्येयाच्या दिशेने , अन् ज्ञानाचं भांडार त्याच्यासाठी खुले झाले. बारावी नंतर NDMVP Medical college Nashik मधुन MBBS व पुढे प्रवरानगर , लोणी येथुन MS GYN करुन आज तो आपल्या आडगाव काॅलेजच्या रुग्णालयाचा MS आहे. ज्या काॅलेज मधुन UG  केले त्याच ठिकाणचा आज तो सर्हेसर्वा असल्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व बॅचमेट्सला आहे.

      आपल्या मितभाषी बोलण्याने व अमोघ ज्ञानामुळे कमी कालावधीत त्याचे नाव काॅलेज व परिसरात ओळखीचे झाले, असंख्य गरजू व गंभीर रुग्णांना त्याने मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले व आजही अविरत त्याचा शिरस्ता अखंड सुरू आहे . 

      अजित म्हणजे निखळ , प्रामाणिकपणे काम करत आपल्या विश्वात रमणारा नितळ पाण्यासारखा स्वच्छ झरा. सौ मॅडमची समर्थ साथ असल्याने कुठलही संकट पार करण्याची शक्ती त्याला लाभलीय . 
प्रसिध्दी व प्रदर्शन यांपासून नेहमीच हे दांपत्य दूर राहिल्याने कुटुंबाला वेळ देत आनंदाने जीवनगाणे गात आहेत. 

    आज अजितचा वाढदिवस ; आपले पुढील आयुष्य निरोगी , आनंदी व वैभवसंपन्न जावो  व आपल्या संसाररुपी अंगणात नेहमी स्नेहरुपी प्राजक्ताची उधळण व्हावी याच मन:पुर्वक शुभेच्छा . 


 जन्मदिन अभिष्टचिंतन 🥃🥂🍾🍺🍸🌷

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....