जीवेत शरद: शतं !!! Dr. Hiren Shah

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिरेनभाई


आपण प्रत्येक जण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतांना काही स्वप्न , काही ऊद्दीष्ट मनाशी बाळगून आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असतो ,
कधी हा प्रवास खडतर असतो तर कधी सुखावह , या दरम्यान  पाहिलेल स्वप्न जेव्हा सत्यात उतरत तो खरा पूर्तीचा क्षण !

असाच क्षण अनुभवणारा  सुखी माणूस म्हणजेच *_HK_* म्हणजे डाॅ हिरेन कांतीलाल शाह.

  NDMVPS MEDICAL COLLEGE NASHIK येथे प्रवेश मिळवल्यानंतर मुळताच प्रचंड बुद्धिमान असलेला HK अजून खुलत गेला ,  बहरत गेला  . 
फक्त पुस्तकी किडा बनून न रहाता सर्वांगीण विकास करत तिथं प्रथम मराठी शिकून त्यांवर प्रभुत्व मिळविले.


   MBBS नंतर आपल्या मातृभुमी म्हणजे गुजरात येथे Anesthesia मध्ये PG करुन आपल्या मुळ गावी मोडासा मध्ये Anesthesia practice सुरु केली; पण स्वस्थ बसेल तो HK कसला त्याने Unity hospital नावाचे multispeciality & trauma care centre सुरु करुन  मोडासा व परिसरातील रुग्णांची सेवा यशस्वीपणे सुरु ठेवली आहे.

_*HK*_ म्महणजे मला  भेटलेला राजा माणूस ,
अतिशय आनंदी ,
दिलखुलास ,
मित्रांसोबत रमणारा ,
हळवा , संवेदनशील 
विनम्रशील ,सर्वांना सहकार्य करणारा ,
आनंदाची परिभाषा शोधून त्यात रमणारा,
जीवनाचा मनसोक्त आनंद घेणारा ,
२४ रॅकेट सोन्याचं खणखणीत नाणं म्हणजे *Dr. HK.*


तर अश्या या  अवलियाचा आज जन्मदिवस 

आजपर्यंतच्या संघर्षमय आयुष्याचा प्रवास पहाता तुझ्या कतृत्वाला झळाळी मिळालीय ; ती अजून प्रकाशमान व्हावी 
इतरांच्या , पेशंटच्या आयुष्यात तु  प्रकाशाच रोपण केलय त्याचा कवडसा तुझ्याही अंगणात यावा व आयुष्य सार्थकी लागाव याच सदिच्छा  !!
💐💐💐
याप्रसंगी एक शुभेच्छामय कविता ख़ास तुझ्यासाठी 


असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..

असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती, 
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, 
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे, 
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....