जीवेत शरद: शतं !!! Dr Ashish Mehta

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशिष मेहता...

"मैं अकेला ही चला था..

मगर लोग आते गए और कारवां बनता गया"

असच काही घडलय 

मज़ाक़ मज़ाक़ मध्ये लिहायला घेतल अन् 
आज ३५ व पुष्प !!

प्रत्येक व्यक्तिमध्ये  भरपूर सदगुण तर 
आपल्या द्रृष्टीने  काही दुर्गुण असतात , 
अर्थात सकारात्मक विचाराने तुमच्यापर्यंत चांगल्या गुणांच्या देण्याघेण्याचा 
व्यापार करतांना  ,
आपल्यापर्यंत पोहचवतांना तुमच्याच सद्गुणांच्या  सानिध्यात 
‘हा देह झाला चंदनाचा 
अन् हाताचा सुवास जाता जाईना ! ‘

तर 
असाच आजचा उत्सवमूर्ति आहे 

*आशिष मेहता ! *

सिकंदराच्या काळात  पुरु नावाचा राजा पूर्व पंजाबावर राज्य करत होता. तो एक शूर व पराक्रमी योध्दा होता . तो एक विद्वान होता .पुरु राजा युद्धात हरला पण तो  सिकंदर पुढे लाचार झाला नाही .त्याने सिकंदराला भेटल्यावर एका राजाप्रमाणेच वागणुक मिळावी असे निक्षून सांगितले . तसाच आपल्या १९९१ बॅच मधील पुरु म्हणजे आशिष ; medical field पासुन दूर गेल्यावर तो कुठल्याही संकटांसमोर झुकला नाही तर सर्व आव्हनांना धिराने तोंड दिले व आज तो furniture उद्यागामध्ये खर्या अर्थाने राजा झाला आहे. 


 मी नेहमी आशिष, सॅंडी, हरपाल,Rambo, मंदार, JP , अजीत या कंपूतील फक्त  शरीरानेच नव्हे तर मानसिक सामाजिक व स्वकर्तृत्वाने ऊंची लाभलेल्या मित्रांच अवलोकन  GT मध्ये करत असतो ;मला जाणवतात त्यांची स्पंदनं , सुद्रृढ मनं . 
या  GT कट्टयावर चर्चा होतात ,गप्पा होतात 
त्या  प्रगतीच्या 
जबाबदारीच्या अन् 
उज्वल भविष्याच्या ....
( कधी कधी KBC पण)
तसेच स्वच्छ भारतासाठी झटण्याच्या व 
प्रबळ राष्ट्रवाद जोपासण्याच्या.

आशिष आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला ऊज्वल भवितव्याचे पंख लाभो ,
तुझ्या नावाप्रमाणे ऊत्तुंग यशासाठी सर्व वडीलधार्यांचे आशिर्वाद लाभो.
तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची झालर मिळू देत ,
आणि तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरू देत ,

या शुभेच्छांसह वाढदिवस अभिष्टचिंतन 

💐💐💐💐

आज तुझ्यासाठी एक फार छान गीत
जे मला नेहमीच ऊर्जा देत असत 
त्याचे बोल आहेत ....

होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको

उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको

येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको

तुझ्या हाती आहे डाव सारा
इसर गजाल कालची रे

देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

आठवणीतला म्हाळशेज....