Posts

Showing posts with the label जीवेत शरद: शतं !!!

जीवेत शरद: शतं !!! Dr. Hiren Shah

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिरेनभाई आपण प्रत्येक जण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतांना काही स्वप्न , काही ऊद्दीष्ट मनाशी बाळगून आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असतो , कधी हा प्रवास खडतर असतो तर कधी सुखावह , या दरम्यान  पाहिलेल स्वप्न जेव्हा सत्यात उतरत तो खरा पूर्तीचा क्षण ! असाच क्षण अनुभवणारा  सुखी माणूस म्हणजेच *_HK_* म्हणजे डाॅ हिरेन कांतीलाल शाह.   NDMVPS MEDICAL COLLEGE NASHIK येथे प्रवेश मिळवल्यानंतर मुळताच प्रचंड बुद्धिमान असलेला HK अजून खुलत गेला ,  बहरत गेला  .  फक्त पुस्तकी किडा बनून न रहाता सर्वांगीण विकास करत तिथं प्रथम मराठी शिकून त्यांवर प्रभुत्व मिळविले.    MBBS नंतर आपल्या मातृभुमी म्हणजे गुजरात येथे Anesthesia मध्ये PG करुन आपल्या मुळ गावी मोडासा मध्ये Anesthesia practice सुरु केली; पण स्वस्थ बसेल तो HK कसला त्याने Unity hospital नावाचे multispeciality & trauma care centre सुरु करुन  मोडासा व परिसरातील रुग्णांची सेवा यशस्वीपणे सुरु ठेवली आहे. _*HK*_ म्महणजे मला  भेटलेला राजा माणूस , अतिशय आनंदी , दिलखुलास , मित्रांसोब

जीवेत शरद: शतं !!! Dr.Ajit Patil

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजित   शालेय जीवनात शिकत असतांना काही संस्कार नकळत आपल्यावर होत असतात. काही शाळा , काही शिक्षक जादूगारासारखं आपल जीवन बदलू शकतात. तर काही मित्रही वेगळ वळण देऊ शकतात, चांगलही अन् कधी वाईटही.      सैनिक स्कुल ही तशीच एक शाळा, ग्रामीण तथा शहरी भागातील विद्यार्थांसाठी सी.बी.एस.सी माध्यम शिकायला मिळावं या उद्दात्त हेतुने शाळा व वसतिगृह एकाच ठिकाणी उभारले. व अशाच सातारा सैनिक स्कुल मधुन ताऊन सुलाखुन निघालेला विद्यार्थी म्हणजे अजित सुभाष पाटील.       सैनिक स्कुलला पोहोचल्यावर मात्र अजितला नवे आकाश मिळाले , कुठलिही मर्यादा नसलेले. मग तो अभ्यासात स्वैर संचार करु लागला नव्या ध्येयाच्या दिशेने , अन् ज्ञानाचं भांडार त्याच्यासाठी खुले झाले. बारावी नंतर NDMVP Medical college Nashik मधुन MBBS व पुढे प्रवरानगर , लोणी येथुन MS GYN करुन आज तो आपल्या आडगाव काॅलेजच्या रुग्णालयाचा MS आहे. ज्या काॅलेज मधुन UG  केले त्याच ठिकाणचा आज तो सर्हेसर्वा असल्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व बॅचमेट्सला आहे.       आपल्या मितभाषी बोलण्याने व अमोघ ज्ञानामुळे कमी कालाव

जीवेत शरद: शतं !!! Dr. Vijay Gawli

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विजय   नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक  क्षेत्राच अवलोकन करायच ठरल तर अनेक दिग्गज व्यक्ति या गावान समाजाला दिल्यात ज्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत .  वैद्यकीय क्षेत्रातही अनेक प्रतिभाशाली विद्यार्थी डॉक्टर झालेत, काही जगभर  , भारतभर  आपल्या  नाशिकचं नाव पोहचवताय तर काही ~ या चिमण्यांनो परत फिरा रे “ या आव्हानाला प्रतिसाद देत पुन्हा आपल्याच नाशकातील रूग्णांची सेवा करतायेत , असच एक विख्यात नाव  *डाॅ विजय गवळी* NDMVPS MEDICAL COLLEGE,NASIK  येथुन MBBS ची पदवी घेऊन  PMT LONI मधुन PATHOLOGY DIPLOMA करुन नंतर BJMC PUNE येथुन DNB करुन हा पठ्ठ्यानं  लंडन मध्ये Transfusion Medicine मध्ये फेलोशिप करुन नाव कमावलं. पण त्याला नाशिक खुणावत होतं व शेवटी त्याने नाशिक येथे BLOOD BANK सुरु केली व आता तर त्याने Zambia मध्ये diagnostic centre  व अद्ययावत हाॅस्पीटल सुरु केले आहे . कुठलाही इगो मनांत न ठेवता दिवसरात्र मेहनत करुन आपल ध्येय गाठलं. याच अनुभवावर आजपर्यंत असंख्य रूग्णांचे प्राण  वाचवून अनेकांना वेदनामुक्त  करून  निरामय जीवन दिले आहे . आज

जीवेत शरद: शतं !!! Dr. Jaydeep Bhambare

Image
वाढदिवसाच्पाहार्दिक शुभेच्छा जयदीप  सुपिरसिध्द  लेखक  व . पु . काळे यांच एक खुप सुंदर वाक्य आहे -  " अंधारातील प्रवासासाठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि त्यांच वेळेस  आपलाही हात कोणाला तरी हवा असतो " मित्रहो  सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात जगभर कुठही असलो म्हणजे एकमेकाशी संवाद साधण सोप झालय , माहिती व तंत्रज्ञानाने जग इतक जवळ आलय  की एका बोटाच्या क्लिकवर आपण काहीही पाहू शकतो  अथवा काहीही माहिती मिळऊ शकतो उदा. आपल्याला काही medicines अथवा काही आजारांची ट्रिटमेंट माहिती करुन घ्यायची असल्यास गुगलची मदत घ्यावी लागते. पण जेव्हा हे नव्हत तेव्हा  ?  किंवा अजूनही गुगल पेक्षा भक्कम पर्याय नेहमी उपलब्ध आहे तो म्हणजे भुबल  !!!! कधीही , कितीही वाजता , कुठेही  तुम्हाला  medicine विषयी अडचण आली डायल करा भुबल !! याचे पायोनियर आहेत  स्वत:  *डॅा जयदीप भांबारे  !* प्रॅक्टीसमध्ये कुठलाही आजार अथवा complications असो, त्याविषयी एकदम इथंबुत  व latest माहिती व treatment तुम्हाला त्वरित मिळेल या हाडाच्या Physician कडुन . उंच शरीरयष्टी , धारदार नाक , ति

जीवेत शरद: शतं !!! Dr. Nilesh Shelar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निलेश आज दिवाळीचा दुसरा दिवस  व डाॅ निलेश शेलार यांचा प्रकटदिन . हा फक्त योगायोग नाही तर निश्चितत: एक कार्यसिध्दता असावी.        कालिदासांच्या रघुवंश या रघुवंशीय राजांच्या आजन्म शुध्दनामाची आठवण होते. आपला या सुंदर आयुष्यात तीन गोष्टींसाठी जन्म झाला.  एक मात्यापित्याची पुण्याईने, दुसरा आपल्या कर्मानुसार, तर तिसरा वैश्विक गरजेतुन ; आपल्या हातून या विश्वासाठी काही कार्य व्हाव, काही अपुर्ण पुर्णत्वास जावं, समृध्द व्हावं, खर तर अशीच काही परमेश्वरीय इच्छा असावी म्हणूनच रोग्यांचं  दु:ख नाहीस करणं , त्याच्या आयुष्यात आनंद द्यावा हीच पुर्णत्वाची प्रचुरता डाॅ निलेश आपल्या या वैश्विक जन्माचा विनियोग निश्चितत: अनुकरणीय आहे .  मनानं अतिशय निर्मळ , सतत हसतमुख प्रचंड सकारात्मक उर्जा  कुटुंबासाठी , नातलगांसाठी आधारवड मित्रांसाठी प्रेमळ सखा,अजातशत्रु , रोग्यांसाठी धन्वंतरी, समाजासाठी प्रेरणा, अस्थीरोगशास्राचा गाढा अभ्यास व अस्थीरोगशास्रासाठी समर्पित असलेल्या निलेशला नक्कीच सर्वाधीक शुभेच्छा व स्नेहभाव.     आपलं आयुष्य असंच रुपमय

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pravin Gore

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण  महान नाटककार शेक्सपियरच एक वाक्य आहे नावात काय आहे ?  पण मला नेहमी वाटत , बस नाम ही काफी है ! काहींच्या नावातच इतका दम असतो की ते नाव त्याची ओळख  बनवते , वलय निर्माण करते .  असच एक नाव आहे             *गोरे* आमच्यासाठीही हे नाव मनांत बसलय ते डाॅ प्रविणच्या रुपाने ,  डॉ प्रविण गोरेच्या व्यक्तिमत्वान !    मुंबई ते नाशिक - व्हाया आडगाव हा मित्रांनी भरलेला सुखमय प्रवास आजही आम्हाला खुणावतो !      विषय कुठलाही असो राजकारण  , समाजकारण  वा मेडिकल , सखोल अभ्यास  सडेतोड ऊत्तर , कुठलाही चोपडेपणा नाही  अगदी ठाम  , एककल्ली मत , सिधी बात नो बकवास !   अभ्यासाची व   पर्यटनाची प्रचंड आवड असणारा प्रविण आयुष्याचा मनमुराद आनंद घेतो , परिसरातील  तसेच परदेशातीलही सर्व प्रेक्षणिय स्थळांची इत्यंभूत माहिती असलेला एकमेव गाईड म्हणजे प्रविण, मित्रांच मोठ वर्तुळ असलेला सांगाती , नवनवीन टेक्नाॅलाॅजीचा वापर करून नव्या कल्पनाविलासात रमणारा , नेहमी अपडेटेड रहाणारा , सबसे आगे सबसे तेज़ , कधी विडंबनकार  तर कधी तत्ववे

जीवेत शरद: शतं !!! Dr. Manjusha Wagh

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजुषा आनंदाचे  डोही आनंद तरंग , आनंदची अंग आनंदाचे जगतगुरु तुकोबारायांचं हे अभंगरुपी गाण ऐकल अन् विलक्षण आनंदाची अनुभूती मिळाल्याचा साक्षातकार झाला ! अगदी वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने व्यक्तिवर्णन पूर्ण झाल्यानंतर होणार्या समाधानाएवढा, त्याबद्दल असणार्या आदर व जिव्हाळा या निकोप भावनांएवढा.       आपल्या बरोबर असणार्या मित्र मैत्रीणींचं चित्र रेखाटल्यानंतर हेणारा आनंद, त्यांवर मिळणारा प्रतिक्रियांचा, कौतुकाचा आनंद अवर्णनीय आहे.असाच आजचा आनंदाचा ठेवा घेऊन आलोय मंजुषाच्या रुपाने !   डाॅ मंजुषा वाघ हि रेडीओलाॅजीची उपासक , सोनोग्राफीची गाढी अभ्यासक , एक्स रे ची सात्विक साधक.  इमेजींग चिकीत्सा आत्मसात करुन निरोगी शरीर व निरोगी मन समाजासाठी अर्पिणारी व हिच विश्वसेवा आहे असे मनोमन मानणारी  निखळ आनंदाची प्रचिती देणारी, आश्वासक , मेहनती, साधी , निरागस,आपल्या कामात निपुण,कुशल अन् तरबेज, समाधानी साधक म्हणजे मंजुषा. तुझं पुढील आयुष्य उज्वलमय, तेजोमय, समाधानी, चैतन्यशक्ती जागवणारं, स्वत:ला आनंद देणारं जावो याच वाढदिवसानिमीत्ताने शुभेच्

जीवेत शरद: शतं !!! Dr. Ananad Tambat

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आनंद. खर तर अगदी सहजच या वाढदिवस शुभेच्छा पत्रास लिहिण्यास सुरुवात झाली पण खरी उभारी मिळाली ती तुमचा सर्वांच्या पुर्वीच्या निखळ कौतुकानं , तुमच्या उत्स्फुर्त  प्रतीसादानं . आनंदाची उधळण करता आली  ती तुमच्या उर्जा देणार्या प्रतीक्रियांमुळे.  वाढदिवसाचा उत्साह वाढतो किंबहुना द्विगुणीत होतो तो आप्तस्वकियांच्या इष्टमित्रांच्या स्नेहपुर्ण शुभेच्छांनी , त्यात आजुन रंग भरला जातो अन् त्या क्षणांचा सण होतो.  धावपळीच्या जीवनात दोन क्षण विसाव्याचे अनुभवतांना भुतकाळाच्या गोड आठवणी बहारतात त्या याचं दिवशी.  उज्वल भविष्याची हुरहूर लागते ती याच दिवशी. असाच एका मित्राचा आज वाढदिवस आहे व तो म्हणजे *आनंद*.       खरा मित्र, सखा , साथी अगदी नावाप्रमाणे कायम आनंदी राहणारा , मनमिळाऊ, मितभाषी, प्रमाणीक व सच्ची मैत्री निभावणारा. उच्च शिक्षीत असलेल्या वडिलांनी त्यांच्या उद्योगशिल कुटुंबात आनंदला वैद्यकिय क्षेत्राची दिक्षा दिली व आनंदने या संधीचे सोने केरुन या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करुन, वेगळा ठसा उमटवत त्यांचा नावलौकीक टिकवून ठेवला .      वर

जीवेत शरद: शतं !!! Dr. Aniruddh Ambekar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिरुद्ध  मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ? काय पुण्य असले की ते घरबसल्या मिळतं ! एका लग्नाची गोष्ट मधील प्रशांत दामले अतिशय छान गातो पण मला त्याला एकच उत्तर द्यावस वाटतं ते बाबा अनि कडे जाऊन बस.तुला आपोआप समजेल सुख म्हणजे नक्की काय असत. TOO MUCH SINCERE, VERY LIMITED EXPECTATIONS, TIME MANAGEMENT,SYSTEMATIC PLANNING, CARING, ACCEPTING NEW TECHNOLOGY या वैशिष्टय असलेल्या व प्रसन्न चेहरा, आदरभाव, आपल्या कामाशी प्रामाणिक, अनिच्या या गुणांनी तो सर्वांच्या गळ्यातील ताईत झालाय.  नाशकात काॅलेज मध्ये असतांना अनिरुद्ध नी  लग्न ठरलेले नसतांनाही Diamond ring घेतली होती व नंतर ती शिल्पाला perfect बसली. २०१९ मधील ९१ बॅचच्या get together  साठी अनिरुद्ध घेत असलेल्या प्रयत्नांसाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. अनि मुंबईतील सर्व बॅंकामध्ये तुझ्या FD राहो, तुझे mutual funds दुप्पट गेले, mediclaim चा no claim बोनस तुला बरेच वर्षे मिळत राहो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना एवढच म्हणावंस वाटतं...... देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो हवय कि

जीवेत शरद: शतं !!! Dr. Sushil Wackchoure

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशिल    सर्व प्रथम सुशिल व सर्व मित्रमंडळींची क्षमा मागतो , दिवसभर कामात असल्याने अभिष्टचिंतन लेख लिहिण्यास उशिर झाला. आरोग्य विभाग एक नावाजलेलं गलबत!!! पहिली पिढी धीरगंभीर वातावरण साधी रहाणी पांढरा शर्ट, बाॅलबेटम पॅंट बारीक केसांचा भांग गळ्यात कायम stetho  टेबलावर उकळत असणार्या अॅल्युमिनीयमच्या भांड्यात काचेच्या syringes  Spirit चा उग्र दर्प गर्दीत ओसांडुन वाहणार्या PHC कुटुंबाकडे दुर्लक्ष तर समाजापासुन थोडे अलिप्त सतत कामात मग्न आदराचं स्थान असलेल जणू काही मोठं माणूस  अक्षरशा देवासमान भासणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व. मग दुसर्या पिढीत थोडा बदल झाला टेबलावर डायलचा फोन आला PHC समोर जीप आली नाकावर चष्मा आला अंगावर सफारी ड्रेस आला गर्दी व सेवाव्रत माग तसच. नंतर आलो आम्ही नये जमाने के साथ नया जोश आयुष्य म्हणजे नुसत काम नसून खुप काही आहे त्याचा दिलखुलास आनंद देणारी व घेणारी पिढी आपल्याच तंद्रीत मशगुल रहात आव्हानांशी बेधडक टक्कर देणारी कलरफुल, सप्तरंगी नव्हे multicolourful  टी शर्ट , जीन

जीवेत शरद: शतं !!! Dr. Suhas Patil

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुहास      *  डाॅ. सुहास पाटील* दिवसभर  कितिही कामाचा आवाका असो  कितीही धावपळ असो कितिही ताणतणाव असो  पण बुद्धिमत्ता , ऊत्कृष्ठ प्रशासन व सुयोग्य नियोजन  यामुळेच कुठल्याही कामाची गड़बड़ नाही , घाई नाही , कोणाशी वाईटपणा नाही , कोणालाही नाराज़ न करता ,  काॅलेजचे काम असो की खाजगी ,कौंटुंबिक  तो अतिशय शांततेने  , प्रेमाने. , हसत हसत पुर्ण करणार  अशी त्यांची  ख्याती !  अगदी हँपी एंडींग सारखी ! असा तो आमचा मित्र सुहास.  आपल्या बुद्धिमतेच्या ज़ोरावर MBBS  व पुढे  MD paeds केल्यावर त्याने  WHO त नोकरी करुन देशाचीच नव्हे तर जगाची सेवा केली आहे. अतिशय समंजस व  सर्वांना सहकार्य करणारा , मनमोकळा व गप्पाष्टक स्वभाव , कुटुंबाला सर्वात जास्त प्राधान्य , पर्यटनचा आवडता छंद जोपासनारा , स्वत:च्या इंदिरानगर येथील बालरुग्णालयातुन बालकांची काळजी घेणारा , जीवनविकास साधणारा , ऊर्जेचा खळाळणारा झरा , मुक्त आभाळात विहार करणारा स्वच्छंदी आझाद पंछी म्हणजे सुहास ! श्री गजाननाच्या आशिर्वादान तुला सर्वच लाभलय , तुझ्या स्वप्नांना अज

जीवेत शरद: शतं !!! Dr. Rahul Bafna

Image
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा राहुल. कॉलेजचा पहिला दिवस... कॉलेजचे आवार तरुणाईने फुलून गेलेले.. सगळीकडे भरून राहिलेला उत्साह आणि उत्सुकता..  अचानक एक सुंदर मुलगी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, 'हाय.. मी अनुष्का.. फर्स्ट इयरला आहे आणि तू ..?'  तो म्हणाला , 'अगं वेडे, मी माझ्या मुलीची फी भरायला आलो आहे !' 🤣🤣 संतूरने काय फक्त मम्याच आंघोळ करतात का ?? आमचा परम मित्र *राहुल बाफना* ही   करतो की  तर अशा सदा चिरतरुण मित्राला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा व मित्रा तु आयुष्यात खुप प्रगती कर व यशाच्या सर्वोच्च शिखरावर आरुढ होऊन पुढील सर्व GT ला उपस्थिती दाखवत जा. DR RUPESH THAKUR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Ramesh Nimse

Image
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा रमेश मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेऊन तुम्ही फक्त लढ म्हणा                       ——कुसुमाग्रज आता इथं कुणालाच सुखाचे २ घास मिळत नाही राजे तुम्ही निर्माण केलेल्या राज्यात राज्य कुणाचे आहे हेच कळत नाही                ——- डाॅ विठ्ठल शिंदे    ऐतिहासिक नाशिकच्या सुसंपन्न , धार्मीक व समाजाभिमुख अशा निमसे परीवारातील मोतीराम काकांच नाव आजुन उज्वल करत आपल्या लोकप्रियतेच वलयनिर्माण केलय ते फक्त सुसंस्कार , सुसंगत, सृजनशील चारीत्र्य व आत्मनिष्टेच्या बळावर असे आमचे परम मित्र व आजचे सत्कारमुर्ती            * रमेश उर्फ रामभाऊ उर्फ रॅंबो निमसे* अत्यंत लाघवी , प्रेमळ, अलवर, हळुवार , आग्रही व थिजऊन टाकणार्या भावनीक व मनमोहक शब्दांची जादु जणू संमोहीत करुन टाकते अन् समोरचा हिप्वोटाइज झाल्या सारखा तो सांगेल तसा करायला लागतो हा माझाच नाही सर्वांचा रमेश विषयी अनुभव आहे. नाशिकरोड च्या नवरत्नांपैकी एक रत्न असलेला रमेश हा  आमचा मित्र असल्याचा अभिमान आम्हाला आहे. कडक शिस्तीत वाढलेला, शिस्तबध्द, घड्याळाला प्रचंड महत्व

जीवेत शरद: शतं !!! Dr. Mahendra Rajole

Image
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा महेंद्र मेरे घर के आगे साईनाथ तेरा मन्दिर बन जाए जब खिड़की खोलूँ तो तेरा दर्शन हो जाए ।। आपल्या घरासमोर  खर्या  अर्थाने  लॅब रुपी मंदीर बनवल अन् तेही महेंद्र ने ! नाशकात अग्रगण्य व संपुर्ण अद्ययावत लॅब  सुरू करण्यात ज्यांच नाव अग्रक्रमान घेतल जाईल तेा म्हणजे डॉ महेंद्र राजोळे ! सुसंप्पन्न राजोळे परिवारातील कुठलीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसतांना  महेंद्रने  MBBS  नाशिक येथुन MD  पुण्यातील BJMC मधुन पुर्ण करुन नाशकात वैयक्तिक पणे सुसज्ज व अद्ययावत लॅब  सुरु केली . परंपरागत पॅथ लॅब ची प्रॅक्टिस न करता  वेगळा मार्ग चोखळला , बदलत्या गरजेतून नाशिक करांना व जवळील ग्रामीण भागांत अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्यात व  एका नव्या पर्वाची नांदी केली . आपल्या मित्रांना व विविध शाखेतील तज्ञ डाॅक्टरांना बरोबर घेत असंख्य रूग्णांना नवसंजिवनी देण्याच काम वाखाणण्या जोगे आहे महेंद्र तसा स्वभावान शांत  सुहास्य व समजूतदार  नेहमी सहकार्यास तयार असणारा अन्  मितभाषी  पण गंभीर व क्रिटीकल पेशंटला हाताळतांना अतिशय तन्मयतेने व बिनधास्तपणे

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Navandar

Image
प्रिय पंकज स . न . वि .वि .  पत्रास कारण की ,  जुन महिना म्हटल की तुझ्या अंगात ऊत्साह संचारलेला असतो ,  ७ जूनला पावसाळा चालु होतो तसा तुझा उत्साह वाढू लागतो , अन् ११ जुनला तर आप्तस्वकिंयासाठी  सण; दुग्धशर्केराबरोबर  बुधाची  जिलेबी  असा योगायोग !  ज्ञान , निर्भयता , संघर्ष हा मंत्र फक्त उच्चार न करता तो प्रत्यक्षीकृत पचवण्याचे तुझी विजीगीषीवृत्ती नक्कीच सर्वस्पर्षी , सर्वव्यापी झालीय. सामाजिकतेच भान जपणारं  , समाजाला दिशा दाखवणारं , अनिष्ठ प्रथा थांबवून प्रगती साधणारं , वही पेनाला महत्व देणारं  तुझ व्यापक ऊद्दिष्ट यामुळ साध्य होईल यात शंका नाही .   सिन्नर मधील नावंदर  या सधन कुटुंबातुन   तुझा प्रवास नासिकच्या  NDMVP MEDICAL COLLEGE  च्या सांस्कृतीक वातावरणात झाला , इथ न थांबतां  लोणीतुन स्त्रीरोगतज्ञ बनुन आज सिन्नर परिसरातील पेशंट करीता दु:ख निवारण्याचे काम करतोय . भरदार देहयष्टी  ,गव्हाळ रंग , व तुला शोभणारे डोळे  तुझा स्वभावच सांगून जातात ,  निखळ आनंद घेत व देत तू अनुभवणारी स्वच्छंदी जीवननिष्ठा  काही निराळीच  आहे !  अगदी एखाद्या हॅपी मॅन स