जीवेत शरद: शतं !!! Dr.Sushil Wackchoure
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Tiger . MBBS च्या First year च्या काही काळातच Prof . Ajit and Mahendra Raje या च्या बरोबरीतील मैत्रीतून माझी Tiger शी ओळख झाली आणि बर्याच गोष्टीमध्ये साधर्म्य असल्याने जी मैत्री जमली ती आजतागायत....
आमच्या दोघांच typical middle class family background .. माझ्या आईबाबांप्रमाणे Tiger ची आई शिक्षण क्षेत्रात आणि बाबा govt service मध्ये.. आम्ही दोघे घरात जेष्ठ पुत्र... (त्या मूळे एक वेगळीच जबाबदारी असते... ) .
गणपती बाप्पा वर नितांत श्रद्धा ठेवणारे.. एकदा Tiger च्या घरी गणेशोत्सव मध्ये " श्री " च्या स्थापनेच भाग्य मला लाभले..Tiger ची family फारच जवळची वाटायची कदाचित या सर्व साधर्म्यामूळे .....
Watching movies हा आमचा common छंद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही दोघे ही AB चे जबरदस्त fan ... आमच्या मैत्री साठी हा common factor more than enough होता.. College Road वरील " Jalaram "च्या opposite lane मध्ये ' मालकंस ' च्या खाली ऊभे राहून सुशील अशी तालबद्ध हाक ( म्हणजे Dil Chahta Hai...मधील Aaakaash अशी हाक ) मारत आम्ही त्याला (मी , Prof Ajit and Mahendra ) बाहेर फिरायला जाण्या साठी बोलवत असू . खूपदा हे काम माझ्याकडे असायचं....त्या वेळी वाटायचं , अतिशय अतरंगी आणि अंतरी नाना कळा असलेल्या याचे " सुशील "हे नाव फारच विनोदी आणि विचित्र ही वाटायचं ..अगदी न शोभणार ..
किती मोठा विरोधाभास वाटायचा... मग कधी हा " वाक् चौरे " वाक म्हणजे वाकडातिकडा आणि चौरे म्हणजे quadrangle आणि त्याचा अपभ्रंश होऊन तो आमच्या साठी "वाघ + चौरे " उर्फ " Tiger Qudra " आणि आपल्या सगळ्याच्या साठी only "Tiger " हे त्याच नामकरण झाल हे समजलेच नाही .. . .
College मध्ये In shirt न करता वरून Apron चढून फिरणारा हा एकमेव माणूस.. ऊगीचच Normal बोलताना ही त्यामध्ये " AB " ची style मारणारा आणि चंद्रकांता तील ' यकू ' नावाने चित्र विचित्र आवाज काढणारा Tiger एक अजब कलाकार, "AB " त्याच्या मध्ये कायमच संचारलेला असतो .. म्हणजे आज सकाळी मी जेव्हा त्याला Birthday wish करायला फोन केला तेव्हा देखील तो AB style मध्ये बोलत होता...
त्याच handwriting ही असच काहीसं विचित्र ..
नाशिक मधील फूकटची भटकंती . .गोदाकाठ च्या संध्याकाळी भेटी आणि आणि जवळपास सगळी थिएटर्स च्या visits, हया मध्ये Tiger कायमच असायचा ...नसायचा तो फक्त एकच गोष्टीत. ..अभ्यासात ..कारण तेवढी एकच गोष्ट त्याची आणि माझी परस्पर विरोधी होती.... एकदम opposite style of study......... . .
UG Tiger बरोबर मी, Prof Ajit and Mahendra नी खूपच enjoy केल ..
खरं तर " FOUR IDIOT'S " नावाची जबरदस्त, भन्नाट Script , Rupesh यावर लिहू शकतो.. .की ज्या मध्ये तो स्वःता एक special appearance and secret element असेल....कारण PG मधील आणि नंतर चे DHO Tiger चे special roles त्या ला माहिती आहेतच...
PG ला आम्ही चौघे बरोबर असलो असतो तर धमाल झाली असती.. बरोबरीने Rupesh ही होताच ,,पण मी आणि Ajit pravara तर Tiger आणि Mahendra आणि Rupesh BJ ला गेले... PSM सारखा सगळ्यांचा नावडता विषय घेऊन Tiger नी Sixer मारला आणि सर्वांना आश्चर्य चकित केल ..पण Subject नव्हे तर त्या वरील आपली command , knowledge matters , हे Tiger ने विविध Post वर काम करताना सिद्ध केले....
PG नंतर, WHO शी संलग्न असताना केलेलं काम , DHULE येथील त्याची Health Department मधील कारकीर्द आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नाशिक मधील कुंभमेळा यशस्वी होण्या साठी त्याने Nashik DHO म्हणून दिलेलं योगदान... हा त्याच्या आता पय॔त च्या यशस्वी कारकीर्दीतला परमोच्च भाग असावा.. .
He is very efficient and successful administrator... .
Health department मधील तो एक Responsible Authority आहे आणि ज्या यशस्वी पणे त्याने हे सगळं केलंय त्याला तोड नाही....Govt service करण्या साठी जे सव॔ काही आवश्यक गुण असतात ते बरेच Tiger ने आत्मसात केलेत ..किंबहूना काही त्याच्या मध्ये उपजतच होते... He is destined to become Govt Officer and serve the people .
प्रत्येक गोष्टीत , field मध्ये pro and cons असतात ..Health Dept. and त्या मधील service करणारे त्याला अपवाद कसे असतील ? एक Responsible post hold करत असताना काही limitations ही असतात .काही गोष्टी मनाविरुद्ध करायला लागतात पण तरीही Tiger नेहमी मित्रांच्या बाजूने उभा राहिलायं , मित्रांना मदत करायला तो कायमच तयार असतो .
काही वेळा post .. तिची value आणि मग बरोबर येणारा एक ego , अहंकार मैत्री मध्ये एक दूरी करू शकतात , पण Tiger त्याला अपवाद आहे .. मित्रासाठी सव॔ formalities बाजूला ठेवून, कुठलाही ego न बाळगता पण तरीही नियमबाह्य कुठल्याही प्रकारची कामे न करता ..मित्रासाठी मदतीला सदैव तत्पर असणारा Tiger ..एक विरळाच.... तो आजही तसाच आहे जसा जवळपास 30 वर्षांपूर्वी होता . Nashik येथील Training Centre चा Principal म्हणून काही दिवसांपूर्वी त्या ने स्वीकारलाय ..त्या च्या special training ने यशस्वी govt. health workers तयार होवोत.. असो , तर हा असा आपला मित्र , एक है Tiger SK च्या TZH सारखा नव्हे तर AB च्या HUM सारखा काही जण प्रचंड मेहनतीने त्याने कर्तृत्वाची फुले उमटवतात. त्यातील Tiger एक.. आणि आपण Health Department मधील एक खरोखर " Tiger" आहोत हे त्याने सिद्ध केलयं.. ...
या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझी ही यशस्वी कारकीर्द अशीच बहरत जावो आणि Government Health Department तूझ नाव सुवर्ण अक्षरांनी लिहीले जावो , या सदिच्छा.....
Thanks JD,Rupesh & Rupali
ReplyDelete