जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मनीषा 


काही शब्द  माणसांची ओळख दर्शवितात 
त्यांना रूप देतात प्रतिमा देतात , 
पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळं शब्दांना ओळख मिळते  ,
ते शब्द खरे  असल्याची  ग्वाही पटते .

अश्यापैकी एक *डॉ मनीषा राठी भुतडा*

साधीभोळी  सज्जन या शब्दांच उदाहरण द्यायचं असेल तर तीच्याशिवाय कोणाला दाखवण शक्यच नाही किंबहुना या शब्दांच सोनं होईल ते खरे ठरतील ते तिच्या दाखल्याने !

अतिशय साधा  विनम्र स्वभाव ,
कुठलही सल किंवा  अढी मनांत न ठेवतां प्रत्येकाशी प्रेमळ वागणारी
फार अपेक्षा न ठेवता 
फार मोठ्या महत्वाकांक्षा न ठेवता 
ठेविले  अनंते तैसेची रहावे या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेऊन 
सतत आपल्या कामात मग्न राहणारी 
एक अतिशय प्रामाणिक सरळ व्यक्ती

आपल्या आडगाव मेडिकल काॅलेजच्या मुशीत  व गोदामाईच्या कुशीत 
तयार झालेल्या नाशिकरोड स्थित नवरत्नांपैकी  एक रत्न म्हणजे मनीषा   

शुद्ध अंतकरण 
स्वभावाचा प्रामाणिकपणा 
साध रहाणीमान व 
सामाजिक परिपक्वता हा गुणात्मक दर्जा टिकवून ठेवतांना तुम्हीं नक्कीच समाजात आपली ओळख तयार केली आहे . 

जगाच्या इतिहासांत अनेक  राजांचा दबदबा होता , 
अलेंक्झांडर  , नेपोलियन , तैमूर , पीटर किंवा आगस्टीन सीझर   पण 
चक्रवर्ती सम्राट ही पदवी मिळाली ती फक्त अशोकाला मिळाली 
कारण काय तर तो सत्य ,अहिंसा ,प्रेम ,सहिष्णूता व शाकाहार याचा पालनकर्ता होता ,
याच सम्राट अशोकासारख राज्य तुम्ही जनमानसावर कराव , 
त्याच्यासारख सुख तुमच्या आयुष्यात याव त्याच्यासारख वैभवशाली तुम्ही व्हाव 
हीच आजच्या वाढदिवशी परमेश्वर चरणी प्रार्थना ! 

मॅडम अशाच हसत रहा मनमोकळेपणान अगदी मनमुराद ! मनसोक्त ! दिलखुलास !

जगतगुरू तुकोबारायांचा हा अभंग तुमच्यासाठी 

हेचि थोर भक्ति आवडते देवा l 
संकल्पावी माया संसाराची ll १ ll 
ठेविले अनंते तैसेचि रहावे l 
चित्ती असो द्यावे समाधान ll २ ll 
वाहिल्या उद्वेग दुखःची  केवळ l 
भोगणे ते मूळ संचिताचे ll ३ ll 
तुका म्हणे घालू तयावरी भार l 
वाहू हा संसार देवापाशी ll ४ ll

DR. RUPESH THAKUR



Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते