जीवेत शरद: शतं !!!, DR. YOGESH



                         

 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा योगेश 


वाढदिवस व्यक्तिविशेष च हे १० व पुष्प ,
आपल्या उत्कट प्रेमामुळे हे रौप्यमय आनंदाचं वाण एकमेकांना देतां आलं , घेता आलं . 
अगदी समर्थाच्या ओवीप्रमाणे 
।। जे जे आपणासी ठावे ।
ते ते इतरांसी सांगावे ।।

एक खुप छान वाक्य वाचनात आलं 
नारळ अाणि माणूस दर्शनी कितीही चांगला  असला तरी 
नारळ फोडल्याशिवाय अन् माणूस जोडल्याशिवाय कळत नाही . 
आयुष्याच्या या प्रवासात खुप माणसं भेटतात काही नात्याची तर काही बिननात्याची ,
काही जवळची असून अपरिचित 
तर काही  अपरिचित असून खुपच जवळीक साधणारी , 
शेवटी फरक विचांरामधील वेवलेंथ जुळण्याचा , 

कुठलीही व्यक्ती ही वरतून दिसते तशी नसते 
गरज असते त्याच्या जवळ जाऊन त्याच्यातील गुण शोधण्याची  ,सकारात्मकतेने बघण्याची ,

त्यातीलच एक  मित्रवर्य डॉ .**योगेश महाले**
वरवर 
मितभाषी 
आत्मनिष्ट 
अबोल 
अव्यक्त
भासणारे योगेशराव मात्र कमालीचे 
मिस्कील  
विनोदी 
हजरजबाबी 
बोलघेवडे 
संभाषणचतुर 
मित्रांमध्ये रमणारे यारों का यार,
कुटुंबवत्सल 
संवेदनशील 
व   नेहमी सत्कार्य व सहकार्य  करणारे मी अनुभवलेय .

महाले परिवारातील राजकीय   व क्रृषीप्रधान पार्श्वभूमी   असुनही योगेशरावांचा पिंड राजकीय कधी वाटलाच नाही किंबहुना ते  रमले फक्त आरोग्य सेवेत ,
आपल्या  कुटुंबात मुलांमध्ये  मित्रांमध्ये  किंवा आप्तस्वकियांमध्येच  . 
कुठल्याही छोट्या गोष्टीचा मनमुराद व निख्खळ आनंद घेणं ,कधीही कुणाला उपद्रव न देता आपल्या कामाशी प्रामाणिक रहाण ,नीटनेटकी व प्रमाणबद्ध जीवनशैली अंगीकारून जीवनात संतुलितपणा त्यांनी ठेवलाय . 

योगेशराव आपणांस  आयुष्यात सर्वोत्तम मिळाव, आपल्या जीवनात यशाची गुढी सतत ऊंचावत राहों  , आपला संसाररूपी  प्राजक्त सदा बहरत राहों व त्याच्या मंद सुवासापुढे आसमंत फिका पड़ो याच आजच्या वाढदिवशी स्नेहमय व प्रेमपूर्वक सदिच्छा ! 

आयुष्याच गमक दर्शवणार्या आनंद या नितांत सुंदर चित्रपटातील एक अर्थपूर्ण रचना असलेलं आवडत गीत आजच्या आनंदीमय दिवशी समर्पित करतों 

कहीं दूर जब दिन ढल जाये
साँझ की दुल्हन बदन चुराए
चुपके से आये
मेरे ख्यालों के आँगन में
कोई सपनों के दीप जलाए

कभी यूँ ही जब हुई बोझल साँसें
भर आईं बैठे-बैठे जब यूँ ही आँखें
तभी मचल के प्यार से चल के
छुए कोई मुझे पर नज़र न आये
कहीं दूर जब दिन ढल जाये...

कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते
कहीं पे निकल आये जन्मों के नाते
है मीठी उलझन बैरी अपना मन
अपना ही हो के सहे दर्द पराये
कहीं दूर जब दिन ढल जाये...

दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे
खो गये कैसे मेरे सपने सुनहरे
ये मेरे सपने, यही तो हैं अपने
मुझसे जुदा न होंगे इनके ये साये

कहीं दूर जब दिन ढल जाये... 

DR. RUPESH THAKUR



Comments

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

आठवणीतला म्हाळशेज....