आठवणीतला म्हाळशेज....
*आठवणीतला म्हाळशेज* कोविड ने सर्वांप्रमाणे माझंही मत परिवर्तन केलंय. २०२० च्या ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बेड वर पडल्यापडल्या *त्या गवाक्षातून* बाह्य जग न्याहाळताना मनाशी पक्की खूणगाठ बांधली, इथून जिवंत बाहेर पडलो तर त्या सर्वांना फोन करेन ज्यांच्याशी मी अबोला धरला आहे, त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करेन ज्यांनी मला दुखावलं होता, आणि माझ्या मेडिकल कॉलेजच्या मित्रांना आवर्जून भेटेल ज्यांना काही न काही कारणास्तव गेली २३ वर्षे भेटू शकलो नाही. त्या सर्वांमध्ये जाईन, राहीन आणि सर्वांना कुठलाही आडपडदा न ठेवता आवर्जून सांगेन की मित्रांनो, तुम्हा सर्वांशिवाय हा अनिल अपूर्णच आहे. नियतीला हे सर्व मान्य होतं आणि मी सुखरूप हॉस्पिटलतून बाहेर पडलो. सर्वांना स्वतःहून फोन केला. मी सुखरूप आहे सांगितलं आणि लवकरच भेटण्याचं वचन दिलं. वायदे करणं सोपं असतं, ते पाळणं कठीण असतं. नेहमीचं रहाटगाडगं चालू झालं आणि मी त्यात व्यस्त झालो. पण पूर्वीसारखं जीव काढणं सोडून दिलं. मनाला वाटेल आणि पटेल तेच करणं सुरू केलं. गेट टू गेदर चा मेसेज ग्रुप वर पडला. *गोवा.* ईच्छा असूनही मी सहभागी होऊ शकत नव्हतो. फीस ह...
Jnda-dil Nissan, even God couldn't live without our dear Rahul
ReplyDelete