Tribute to Rakesh Dhingra


           १५ आॅगस्ट १९९१ चा दिवस, वेळ सकाळी १० वा; मी KTHM GYMNASIUM hall समोरील रस्त्यावर कोपर्यात white apron घालुन उभा होतो. भिती याची होती की पहिल्याच दिवशी senior आपली रॅगिंग घेतील का? तेवढ्यात एक  मित्र शेजारी  उभा होता white apron  मध्ये व  घामाने भिजलेला , मला म्हणाला काय घाबरतोस चल . मी नाव विचारुन introduction करुन घेतलं , त्यांच वेळी मी निश्चिंत झालो राकेश धिंग्रा , म्हणजे पंजाब मुंडा मग कशाची भिती ,तडक काॅलेज मध्ये पहिल्या दिवशी entry मारली . कोण senior व कसली रॅगिंग? 

     Nirmala convent मधुन शालेय शिक्षण व HPT मधुन १२ वी , नंतर NDMVP मधुन MBBS झाल्यावर BJMC PUNE येथुन MD GYN तेही gold medal नी पास असा हा माझ्या मोठ्या भावाचा शैक्षणिक प्रवास होता.

    तसा MBBS च्या तिन्ही वर्षी माझा व राकेशचा खुप जवळून संबंध आला नाही कारण दोघांच्या बॅच वेगळ्या होत्या परंतु internship मध्ये नाशिक सिव्हील ला सोबत असल्यापासुन ते शेवटपर्यंत मात्र याची सोबत मिळाली.

     Internship मध्ये असतांना राकेश ने सर्व interns ला घरी नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते , तेव्हा तब्बल ७-८ प्रकारचे पराठे तेही गावठी लोण्याबरोबर आग्रहाने खाल्याने सर्वेजन २ दिवस जेवलो नव्हतो.
   Sassoon मध्ये  आम्ही दोघे  JR असतांना रुम पार्टनर होतो तेही ICU लगतच्या रुम मध्ये ; तेव्हा तर सिस्टरांची विनंती यायची की पेशंटला Co2 नकोय तर O2 ची गरज आहे.

     Exam going झाल्यावर तर संपुर्ण resident quartets मध्ये राकेश ची दहशत होती कारण आमच्या येवढ्या खोड्या आजपर्यंतच्या इतिहासांत कधी घडल्या नव्हत्या . तरीही हि आसामी gold medal घेऊन MD पास झाली . अभ्यासात हुशार म्हणजे एकपाठी तसेच प्रचंड वाचनाचे वेड व तासन तास library मध्ये अभ्यास करण्याची क्षमता या अवलियात होती तसेच कोणताही topic दुसर्याला समजावून सांगण्याची त्याची हातोटी होती. 

    राकेशनी ना.रोड तर मी लासलगाव मध्ये Gyn practice सुरु केली. मला कधीही काहीही अडचण आल्यास तो मध्यरात्रीही मदतीसीठी तयार असायचा. माझ्याकडे complicated surgery ला मला मदत करन्यास तो आवर्जुन यायचा. कितीतरी complications ची मॅनेजमेंट  त्याने फोन सांगावी व मी लासलगावात manage करावी असे चालायचे .

    राकेश आयुष्य खरेच राजा सारखे जगला. Practice, मित्रमंडळी , नातेवाईक सर्वच बाबतीत त्याने मोठे मन ठेवले होते. खुप गोष्टी मी राकेश कडुन शिकलो. व राकेशनी exit ही राजा सारखीच घेतली . शेवटच्या दिवसापर्यंत हा OPD , Surgery सर्व करत होता पण म्हणतात ना  जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.

    BJ त मी राकेशच्या लग्नापासुन ते मुलाच्या जन्माचा व आजारपणाचा अगदी अखेरच्या क्षणापर्यंतचा साथीदार  होतो , Diabetis व त्या रिलेटेड complications तसेच मानसिक तनाव  मी अगदी जवळुन पाहिले आहेत . मी आज आपल्या सर्वांना सांगु इच्छीतो की आपल्या जीवनात व्यायामाला महत्व द्या.
         एका गझलकाराने म्हटले आहे—-
   जिंदगी एक जादुका खिलौना है ।
 
   मिल जाए तो मिट्टी है ।
   खो जाए तो सोना है ।
सर्व जिवलग मित्रांनो...
गुलाबी थंडी पडली आहे,रात्रीचं
जागरण कमी करा,सकाळी लवकर
 उठा,आणि 4 ते 5 कि.मी.चाला
या 4 महिन्यात जो चांगला व्यायाम
करेल त्याला वर्षभर आजार होणार नाही,आपले आरोग्य, आपले शरीर
या गोष्टी जगामध्ये सर्वात अनमोल
आहे,कितीही पैसे कमावले तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी आपण
धडधाकट असणे आवश्यक आहे
पैसा भरपूर आहे पण आरोग्य नसेल तर असलेल्या पैश्याचे आपण वाॅचमेन
 व हमाल आहोत दुसरे काहीच नाही
म्हणून...
*शरीर ओके तर ठिकाणावर डोके*
एक लक्षात असु द्या,आपल्या बापाचं
नाव व संपत्ती आपल्याला मिळू शकतेपण आरोग्य,शरीर आपले आपल्याचं कमवावे लागते,ते वारसाहक्काने मिळत नाही...
आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता पण इथुन
पुढे ज्याचं आरोग्य उत्तम तोचं खरा
 श्रीमंत असचं म्हटलं जाईल...
प्राॅपर्टी पैसा समृद्धी खुप आहे पण खाता येत नाहीये,हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून शरीर,आरोग्य हे जपा..!
पण त्याचबरोबर चांगली माणसंही जपा...कारण *जसे उत्तम शरीरा* *शिवाय आनंद नाही,तसेचं* *जिवलग मित्रां शिवाय जीवन नाही*
        ::::::: *🙏* :::::::
   तर मित्रांनो जीवनावर प्रेम करायला शिका , जन्म एकदाच मिळतो , जीवन कसं जगायचं ते राकेशनी शिकवले.
    राकेश चा सुपुत्र आज IIT POWAI मधुन engineering करतोय तर त्याची सहचारीणी आज ना.रोड मध्ये Gyn practice करतेय . देव त्यांना भरभराट देवो.
 आज राकेशला जाऊन जवळपास  ६ वर्षे झालीय.
  शेवटी एवढच म्हणावं वाटतं,
झाले  बहु.   होतील बहु
परंतु या सम हा   !

  कालाय तस्मै नम:
पण
 आयुष्य मार्गक्रमण करतांना, संघर्ष वाटेवरील प्रवासी होतांना आपल्या जीवनातील मधुर स्मृती सर्व बॅचमेट्सला निरंतर प्रेरणा देतील हे मात्र नक्की.

Rupesh Thakur

Comments

  1. Makes me emotional again ...Rupesh..Rakesh lived life like kingsize.king size...extraordinary talented fellow...

    ReplyDelete
  2. I am a close witness of every thing right from second year mbbs to his last breath...

    ReplyDelete
  3. Heartfelt Tribute...!
    Very well written...

    ReplyDelete
  4. You know you are reading a astute writer when every word, every sentence and every paragraph pierces the heart. I only knew our batchmate, Rakesh Dhingra as studios and a brilliant fellow, this write up has revealed many a facets of his life and personality. Looking forward to many more such...keep writing. Regards, Dr Swati DX Pawar

    ReplyDelete
  5. Very well written Rupesh. Really Rakesh was very LIVELY person and FRIENDLY to all. It was really unbelievable to accept his loss for. We should really do something for a SOCIAL cause as tribute to our friends RAKESH and RAHUL, by creating more awareness of health,fitness, organ donation, Nature conservation and many more........

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

आठवणीतला म्हाळशेज....