वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा योगेश वाढदिवस व्यक्तिविशेष च हे १० व पुष्प , आपल्या उत्कट प्रेमामुळे हे रौप्यमय आनंदाचं वाण एकमेकांना देतां आलं , घेता आलं . अगदी समर्थाच्या ओवीप्रमाणे ।। जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे ।। एक खुप छान वाक्य वाचनात आलं नारळ अाणि माणूस दर्शनी कितीही चांगला असला तरी नारळ फोडल्याशिवाय अन् माणूस जोडल्याशिवाय कळत नाही . आयुष्याच्या या प्रवासात खुप माणसं भेटतात काही नात्याची तर काही बिननात्याची , काही जवळची असून अपरिचित तर काही अपरिचित असून खुपच जवळीक साधणारी , शेवटी फरक विचांरामधील वेवलेंथ जुळण्याचा , कुठलीही व्यक्ती ही वरतून दिसते तशी नसते गरज असते त्याच्या जवळ जाऊन त्याच्यातील गुण शोधण्याची ,सकारात्मकतेने बघण्याची , त्यातीलच एक मित्रवर्य डॉ .**योगेश महाले** वरवर मितभाषी आत्मनिष्ट अबोल अव्यक्त भासणारे योगेशराव मात्...