जीवेत शरद: शतं !!! Dr. Manjusha Wagh
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजुषा आनंदाचे डोही आनंद तरंग , आनंदची अंग आनंदाचे जगतगुरु तुकोबारायांचं हे अभंगरुपी गाण ऐकल अन् विलक्षण आनंदाची अनुभूती मिळाल्याचा साक्षातकार झाला ! अगदी वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने व्यक्तिवर्णन पूर्ण झाल्यानंतर होणार्या समाधानाएवढा, त्याबद्दल असणार्या आदर व जिव्हाळा या निकोप भावनांएवढा. आपल्या बरोबर असणार्या मित्र मैत्रीणींचं चित्र रेखाटल्यानंतर हेणारा आनंद, त्यांवर मिळणारा प्रतिक्रियांचा, कौतुकाचा आनंद अवर्णनीय आहे.असाच आजचा आनंदाचा ठेवा घेऊन आलोय मंजुषाच्या रुपाने ! डाॅ मंजुषा वाघ हि रेडीओलाॅजीची उपासक , सोनोग्राफीची गाढी अभ्यासक , एक्स रे ची सात्विक साधक. इमेजींग चिकीत्सा आत्मसात करुन निरोगी शरीर व निरोगी मन समाजासाठी अर्पिणारी व हिच विश्वसेवा आहे असे मनोमन मानणारी निखळ आनंदाची प्रचिती देणारी, आश्वासक , मेहनती, साधी , निरागस,आपल्या कामात निपुण,कुशल अन् तरबेज, समाधानी साधक म्हणजे मंजुषा. तुझं पुढील आयुष्य उज्वलमय, तेजोमय, समाधानी, चैतन्यशक्ती जागवणारं, स्वत:ला आनंद देणारं जावो याच वाढदिवसानिमीत्ताने शुभेच्