Posts

आठवणीतला म्हाळशेज....

Image
*आठवणीतला म्हाळशेज* कोविड ने सर्वांप्रमाणे माझंही मत परिवर्तन केलंय. २०२० च्या ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बेड वर पडल्यापडल्या *त्या गवाक्षातून* बाह्य जग न्याहाळताना मनाशी पक्की खूणगाठ बांधली, इथून जिवंत बाहेर पडलो तर त्या सर्वांना फोन करेन ज्यांच्याशी मी अबोला धरला आहे, त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करेन ज्यांनी मला दुखावलं होता, आणि माझ्या मेडिकल कॉलेजच्या मित्रांना आवर्जून भेटेल ज्यांना काही न काही कारणास्तव गेली २३ वर्षे भेटू शकलो नाही. त्या सर्वांमध्ये जाईन, राहीन आणि सर्वांना कुठलाही आडपडदा न ठेवता आवर्जून सांगेन की मित्रांनो, तुम्हा सर्वांशिवाय हा अनिल अपूर्णच आहे. नियतीला हे सर्व मान्य होतं आणि मी सुखरूप हॉस्पिटलतून बाहेर पडलो. सर्वांना स्वतःहून फोन केला. मी सुखरूप आहे सांगितलं आणि लवकरच भेटण्याचं वचन दिलं. वायदे करणं सोपं असतं, ते पाळणं कठीण असतं. नेहमीचं रहाटगाडगं चालू झालं आणि मी त्यात व्यस्त झालो. पण पूर्वीसारखं जीव काढणं सोडून दिलं. मनाला वाटेल आणि पटेल तेच करणं सुरू केलं. गेट टू गेदर चा मेसेज ग्रुप वर पडला. *गोवा.*  ईच्छा असूनही मी सहभागी होऊ शकत नव्हतो. फीस ह...

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

Image
ये कहॅा आ गये हम... यॅूं ही साथ साथ चलते …..    अमिताभ ने हे गाणे सिलसिला मध्ये म्हटले आहे पण खर तर तो फक्त अभिनय होता , पण हा अनुभव जर स्वत:ला प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर तुम्हास दोस्ती लेकवुड रिसोर्ट , माळशेज येथे येण्याशिवाय पर्याय नाही.     खर तर १२ फेब्रुवारी च्या स्नेहसंमेलनाची मुहुर्तमेढ २ महिण्यांपुर्वी  संदिप वाबळेच्या फोन मुळे झाली. संदिपने मला व JD  ला फोन वरून संकल्पना मांडली व त्यास आम्ही अनुमोदन दिले व Get together  करायचे तर माळशेजलाच हे पक्के ठरले. नंतर सुनिल आम्हा तिघांना येऊन मिळाला, व त्यानंतर खरी आग्रहाला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांना फोन व आग्रह करुन झाले, पण पाहिजे तसे यश येत नव्हते ; तशात omicron मुळे तर GT  होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . नंतर आरोग्यावरील संकट निवळल्यावर मात्र *माळशेज* वर शिक्का मोर्तब झाले.    Organiser Team च्या आग्रहावरून स्वप्ना आम्हाला join झाली व तिथूनच पुढे सर्वांना पुन्हा फोन व आग्रह झाले. मी, सुनील व JD तिघांनी मिळुन *घटनास्थळी*भेट दिली आणि १२ फेब्रुवारी तारीख निश्चित झाली....

RELIVING THE MEMORIES...1991 GOLDEN BATCH REUNION... WITH DR YOGESH

Image
HAPPY BIRTHDAY, YOGESH  VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

जीवेत शरद: शतं !!!, DR. YOGESH

Image
                                  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा योगेश  वाढदिवस व्यक्तिविशेष च हे १० व पुष्प , आपल्या उत्कट प्रेमामुळे हे रौप्यमय आनंदाचं वाण एकमेकांना देतां आलं , घेता आलं .  अगदी समर्थाच्या ओवीप्रमाणे  ।। जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे ।। एक खुप छान वाक्य वाचनात आलं  नारळ अाणि माणूस दर्शनी कितीही चांगला  असला तरी  नारळ फोडल्याशिवाय अन् माणूस जोडल्याशिवाय कळत नाही .  आयुष्याच्या या प्रवासात खुप माणसं भेटतात काही नात्याची तर काही बिननात्याची , काही जवळची असून अपरिचित  तर काही  अपरिचित असून खुपच जवळीक साधणारी ,  शेवटी फरक विचांरामधील वेवलेंथ जुळण्याचा ,  कुठलीही व्यक्ती ही वरतून दिसते तशी नसते  गरज असते त्याच्या जवळ जाऊन त्याच्यातील गुण शोधण्याची  ,सकारात्मकतेने बघण्याची , त्यातीलच एक  मित्रवर्य डॉ .**योगेश महाले** वरवर  मितभाषी  आत्मनिष्ट  अबोल  अव्यक्त भासणारे योगेशराव मात्...

RELIVING THE MEMORIES...1991 GOLDEN BATCH REUNION...WITH DR MANISHA

Image
  HAPPY BIRTHDAY, MANISHA  VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha

Image
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मनीषा   काही शब्द  माणसांची ओळख दर्शवितात  त्यांना रूप देतात प्रतिमा देतात ,  पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळं शब्दांना ओळख मिळते  , ते शब्द खरे  असल्याची  ग्वाही पटते . अश्यापैकी एक *डॉ मनीषा राठी भुतडा* साधीभोळी  सज्जन या शब्दांच उदाहरण द्यायचं असेल तर तीच्याशिवाय कोणाला दाखवण शक्यच नाही किंबहुना या शब्दांच सोनं होईल ते खरे ठरतील ते तिच्या दाखल्याने ! अतिशय साधा  विनम्र स्वभाव , कुठलही सल किंवा  अढी मनांत न ठेवतां प्रत्येकाशी प्रेमळ वागणारी फार अपेक्षा न ठेवता  फार मोठ्या महत्वाकांक्षा न ठेवता  ठेविले  अनंते तैसेची रहावे या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेऊन  सतत आपल्या कामात मग्न राहणारी  एक अतिशय प्रामाणिक सरळ व्यक्ती आपल्या आडगाव मेडिकल काॅलेजच्या मुशीत  व गोदामाईच्या कुशीत  तयार झालेल्या नाशिकरोड स्थित नवरत्नांपैकी  एक रत्न म्हणजे मनीषा    शुद्ध अंतकरण  स्वभावाचा प्रामाणिकपणा  साध रहाणीमान व  सामाजिक परिपक्वता हा गुणात्मक दर्जा टिकवून ठेव...

RELIVING THE MEMORIES ...1991 GOLDEN BATCH REUNION...WITH DR. SUCHETA

Image
   HAPPY BIRTHDAY, SUCHETA VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR